Uncategorized

नरेश कामथे याचे अल्पशा आजाराने निधन 

नरेश कामथे याचे अल्पशा आजाराने निधन 

नागोठणे : नागोठण्यातील आंगरआळी भागातील इलेक्ट्रिकल कामातील तरुण व्यावसायिक नरेश नारायण कामथे (वय ३८) याचे खारघर येथील मेडिकव्हर या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास  निधन झाले. दिवंगत नरेश कामथे याच्या पश्चात पत्नी मयुरी, एक पाच वर्षांची मुलगी, भाऊ यांच्यासह मोठा कामथे परिवार आहे.
दिवंगत नरेश कामथे याच्या पार्थिवावर येथील अंबा घाटावरील वैंकुठ स्मशानभूमीत गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कामथे परिवारासह त्यांचे नातेवाईक, नागोठण्यासह विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच अंगरआळीतील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत नरेश याचे दशक्रिया विधी शुक्रवार दिनांक २३ मे रोजी उद्धार येथे तर उत्तरकार्य सोमवार दिनांक २६ मे रोजी आंगरआळी येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती कामथे कुटुंबियांकडून देण्यात आली. प्रेमळ, मनमिळाऊ स्वभाव तसेच मितभाषी असूनही आपल्या कामात प्रामाणिक असलेल्या नरेश याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण आंगरआळी भागात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!