महाराष्ट्र ग्रामीण
ऑपरेशन सिंदूर मधील सैनिकांच्या गौरवार्थ नागोठण्यात तिरंगा यात्रा
राष्ट्रभक्तीच्या, राष्ट्रप्रेमाच्या व सैनिकांच्या सन्मानपर घोषणांनी परिसर दणाणला

ऑपरेशन सिंदूर मधील सैनिकांच्या गौरवार्थ नागोठण्यात तिरंगा यात्रा
राष्ट्रभक्तीच्या, राष्ट्रप्रेमाच्या व सैनिकांच्या सन्मानपर घोषणांनी परिसर दणाणला
महेश पवार
नागोठणे : जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे फिरण्यास गेलेल्या भारतीय नागरिकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत धडक कारवाई करीत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उध्वस्त करून दहशतवाद्यांचा खात्मा करून बदला घेतला. भारतीय सैनिकांच्या या अतुलनीय शौर्याचा गौरव करण्यासाठी नागोठणे व रोहा तालुक्यातील नागरिकांकडून नागोठण्यात मंगळवारी (दि.२०) भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी राष्ट्रभक्तीपर घोषणांनी नागोठणे परिसर दणाणून गेला.

निवृत्त सैनिकांचा केला सन्मानया तिरंगा रॅलीची सुरुवात नागोठण्यातील छ. शिवाजी महाराज चौकातून करण्यात आली. तत्पूर्वी या तिरंगा रॅलीत सहभागी झालेले माजी सैनिक यशवंत चित्रे, राजेंद्र भोईर, उदंड रावकर, अमृत गदमले, भानुदास मेहता, प्रवीण शिर्के, माने (खांब) यांचा यथोचित सन्मान छ. शिवाजी महाराज स्मारकाजवळ करण्यात आला. त्यानंतर या तिरंगा रॅलीला सकाळी १०.३० वाजता छ. शिवाजी महाराज चौकातून सुरुवात करण्यात आली. नंतर बाजारपेठ, खुमाचा नाका, गांधी चौक मार्गे नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात या तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.

नागोठण्यातील या तिरंगा रॅलीत नागोठणे शहर व विभागातील सर्वपक्षीय नेतेगण, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये भाई टके,
शिवरामभाऊ शिंदे, हरेश काळे, विलास चौलकर, सोपान जांबेकर, राजेश मपारा, लियाकतशेठ कडवेकर, श्रेया कुंटे, जयराम पवार, किशोर म्हात्रे, महेश ठाकूर, एकनाथ ठाकूर, आनंद लाड, सचिन मोदी, नामदेव लाड, दिनेश घाग, मारुती शिर्के, विजय नागोठणेकर, बिपिन सोष्टे, गणेश घाग, ज्ञानेश्वर शिर्के, तुकाराम शिर्के, निवृत्ती जंगले, विठोबा माळी, अशोक अहिरे, शेखर गोळे, पंकज जैन, सुरेश जैन, प्रियांका पिंपळे, अपर्णा सुटे, दौलतशेठ मोदी, प्रविण ताडकर, निखिल मढवी, गणेश जाधव, भगवान मढवी, भरत गिजे, रमेश जाधव, दत्ताराम मढवी, संतोष रेवाळे, सुभाष पाटील, किरण गुरव, पवन जगताप, बाळा पोटे, रऊफ कडवेकर, अजगर सय्यद, जावेद दापोलकर, रतन हेंडे, सिद्धेश कदम, अविनाश घाग, हरेश घाग, संस्कार घाग, निलेश पवार, क्रिश पवार आदींसह इतरही असंख्य नागरिक आणि महिला या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. या तिरंगा रॅली दरम्यान नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने रॅलीसाठी चोख बंदोबस्त ठेऊन सहकार्य केले.