कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण

रोहा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील दोन्ही न्यायाधिशांना निरोप 

भविष्यासाठी वकील वर्गाने दिल्या शुभेच्छा 

रोहा दिवाणी व फौजदारी न्यायालयातील दोन्ही न्यायाधिशांना निरोप 

भविष्यासाठी वकील वर्गाने दिल्या शुभेच्छा 
महेश पवार 
नागोठणे : रोहा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील मुख्य न्यायाधीश सुनील महाले यांची वरिष्ठ न्यायाधीश म्हणून पदोन्नती होऊन मलकापूर (जि.बुलढाणा) येथील न्यायालयात बदली झाल्याने तसेच रोहा न्यायालयातील सह न्यायाधीश श्रीमती मेघा हासगे यांची औसा (जि.लातूर) येथे बदली झाल्याने रोहा वकील संघटनेतर्फे दोन्ही न्यायाधीशांचा निरोप समारंभ रोहा न्यायालयातील वकील रुम मध्ये सोमवारी (दि.२६) सायंकाळी कार्यालयीन वेळेनंतर संपन्न झाला. यावेळी दोन्ही न्यायाधीश साहेबांचा शाल, श्रीफळ व रोहा शहराची ग्रामदेवता श्री धावीर महाराज यांची तसवीर देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व वकील वर्गाने दोन्ही न्यायाधीश साहेबांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी व यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.  
रोहा तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. नानासाहेब देशमुख यांनी आपल्या प्रास्ताविकात दोन्ही न्यायाधीश साहेबांनी भविष्यात यशस्वी वाटचाल करावी असे मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.  या कार्यक्रमाला रोहा तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. नानासाहेब देशमुख यांच्यासह  सचिव अॅड. धनंजय धारप, खजिनदार अॅड. महेश घायले,  रोहा न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आर. बी. सावंत,  अॅड. एम.डी. पाटील, ॲड. मीरा पाटील, अॅड. समीर सानप, अॅड. दिनेश वर्मा,  अॅड. एम. के. शिंदे, अॅड. एस.ए. हाफिज, अॅड. अजित दांडेकर, ॲड. महेश पवार, ॲड. संदीप भोसले, ॲड. प्रवीण दाभाडे, ॲड. प्रणाली पाटणे, ॲड. फाल्गुनी ठक्कर, ॲड. कविता मोरे, ॲड. सुरेखा चव्हाण, ॲड. दिव्या सावंत, ॲड.प्रतीक पाटणकर, ॲड. भाग्यश्री गावडे, ॲड. स्मिता कुथे, ॲड. प्रवीण भोनगे, ॲड. प्रेरित वालीवकर, ॲड. सार्थक जाधव, ॲड. अनुश्री कुंटे 
आदींसह वकील बहुसंख्येने उपस्थित होते. 
या कार्यक्रमास न्यायाधीश सुनील महाले यांच्या पत्नी सुरेखा महाले, मुली कु. अर्णवी महाले, कु. अपूर्वा महाले, न्यायाधीश सुनील महाले यांचे सासरे महादेव ढोबळे, सासूबाई बेबीबाई ढोबळे हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी न्यायाधीश सुनील महाले यांच्या पत्नी सुरेखा महाले यांचा सन्मानही महिला वकिलांकडून करण्यात आला. या कार्यक्रमात न्यायाधीश सुनील महाले व न्यायाधीश मेघा हासगे यांनी आपल्या मनोगतात रोहा न्यायालयातील कामकाजातील आठवणींना उजाळा दिला व रोहा न्यायालयातील आठवणी नेहमीच आमच्या कायम लक्षात राहतील असे सांगितले. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन ॲड. दिव्या सावंत यांनी केले.  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!