महाराष्ट्र ग्रामीणवाढदिवस
रोहा तालुक्यातील वरिष्ठ बौद्धाचार्य आयु. किसन शिर्के यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

रोहा तालुक्यातील वरिष्ठ बौद्धाचार्य आयु. किसन शिर्के यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
नागोठणे : बौद्धजन पंचायत समिती नागोठणे शाखा क्रमांक ३ चे नवनिर्वाचित अध्यक्ष, नागोठणे ग्रामपंचायत मधील अभ्यासू लेखनिक, सर्व मित्रपरिवार यांच्या सुख दुःखात नेहमी सहभागी होणारे, मनमिळावू व प्रेमळ स्वभाव असलेले आणि रोहा तालुक्यातील वरिष्ठ बौद्धाचार्य असलेले नागोठण्यातील रमाई नगर मधील रहिवासी आयु. किसन धर्मा शिर्के यांचा वाढदिवस नागोठण्यातील हायवे नाका येथील

हॉटेल विशाल मध्ये सायंकाळी केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हॉटेल विशाल चे मालक विलास कांबळे, पत्रकार ॲड. महेश पवार, पत्रकार अनिल पवार, वैशाली विलास कांबळे, विशाल कांबळे, राम राठोड आदींसह किसन शिर्के यांचा मित्रपरिवार यावेळी उपस्थित होता. दरम्यान किसन शिर्के यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना नागोठण्यासह रोहा तालुक्यातील त्यांच्या मोठ्या संख्येने असलेल्या मित्रपरिवाराने व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.
