महाराष्ट्र ग्रामीणराजकारण

यशस्वी मंत्री म्हणून ना. आदितीताई तटकरे यांच्या यशाबद्दल नागोठण्यात जल्लोष 

छ. शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

यशस्वी मंत्री म्हणून ना. आदितीताई तटकरे यांच्या यशाबद्दल नागोठण्यात जल्लोष 

छ. शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतषबाजी करून कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव

महेश पवार
नागोठणे : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या १०० दिवस कृती आराखडा उपक्रमात महिला व बालविकास विभागाने कल्याणकारी योजनांची यशस्वी अंमलबजावणी, विभागाचे आधुनिकीकरण व लोकाभिमुख प्रशासन हे ध्येय साध्य करत ८०% गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला. त्यामुळे आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि विशेष करून महिला व बालविकास विभागासाठी अत्यंत गौरवाचा असल्याने महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळातील महिला व बालकल्याण खात्याच्या एक कर्तबगार व यशस्वी मंत्री म्हणून ना. आदितीताई तटकरे यांच्या या यशाबद्दल नागोठण्यातील छ.शिवाजी महाराज चौकात सायंकाळी साडेचार  वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागोठण्यातील कार्यकर्त्यांतर्फे फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. 
यावेळी राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, हरेशशेठ काळे, नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके,  जुगनशेठ जैन, बिपिन सोष्टे, दिलीप शहासने, उल्हास शिंदे, गणेश  नागोठणेकर, उमाजी चव्हाण, श्रीकांत रावकर, मनोज टके, चेतन टके, गुड्डू मोदी, भाजपा कार्यकर्ते रमेश जाधव, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस आशाताई शिर्के, शहर अध्यक्ष सुजाता जवके, उपाध्यक्षा प्रतिभा तेरडे, सचिन जैन, सिद्धेश काळे, सुशील टके, मोरेश्वर सगने, पप्पू जैन, आदींसह कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!