पॉलिटेक्निकला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नागोठण्यातील सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा – किशोर जैन
१६ जून पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत

पॉलिटेक्निकला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नागोठण्यातील सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा – किशोर जैन
१६ जून पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत
महेश पवार
नागोठणे : तंत्रनिकेतनला (पॉलिटेक्निकला) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासकीय आदेशान्वये नागोठणे येथे कॅप प्रवेशासाठी वेलशेत येथे भा.ए.सो चे S.S.O.S.P पॉलिटेक्निक येथे पदविका अभ्यासक्रमाच्या नोंदणीसाठी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
सुविधा केंद्रामार्फत डिप्लोमा इंजिनिअरींग प्रवेशाबाबत विदयार्थी – पालकांना मार्गदर्शन केले जात आहे. या सुविधा केंद्राचे उद्घाटन भा.ए.सो.चे संस्थापक, माननीय किशोर जैन यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नागोठण्यातील या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन भाएसोचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांनी केले आहे.
यावेळी आपल्या मनोगतात किशोर जैन यांनी सांगितले की, २००९ पासून चालू झालेल्या डिप्लोमा कॉलेज मधून २५०० एवढे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून २२०० एवढे विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी आमच्या कॉलेज मध्ये शिक्षण घेवून नोकरी व व्यवसायात प्राविण्य मिळवले आहे. तरी ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्याना मी आवाहन करतो की, विद्यार्थ्यानी व्यवसायाभिमुुख असलेल्या या अभ्यासक्रमात प्रवेश घेवून आपले जीवन यशस्वी करावे. या निमित्ताने अधिकाधिक विद्यार्थ्यानी या आपल्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक जैन यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.