महाराष्ट्र ग्रामीणवाढदिवस
आरोग्य खात्याचे सेवानिवृत्त कर्मचारी गजानन खराडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहत साजरा
मुलांनी व नातवंडांनी केले नेत्रदिपक आयोजन

आरोग्य खात्याचे सेवानिवृत्त कर्मचारी गजानन खराडे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहत साजरा
मुलांनी व नातवंडांनी केले नेत्रदिपक आयोजन
महेश पवार
नागोठणे : रोहा तालुक्यातील तिसे गावातील रहिवासी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्या मधील सेवानिवृत्त कर्मचारी गजानन तुकाराम खराडे उर्फ अण्णा यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस रविवार दिनांक १ जून रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गजानन खराडे यांच्या मुलांनी व नातवंडांनी या नेत्रदिपक सोहळ्याचे आयोजन केले होते.

गजानन खराडे यांच्या या अमृत महोत्सवी वाढदिवसाला त्यांच्या पत्नी सौ. सुमन गजानन खराडे, गजानन खराडे यांचे नागोठण्यातील मेहुणे दिलीपभाई टके, हरेश टके, बाळा टके, भाऊ रमेश खराडे (सेवानिवृत्त तलाठी), मुली सौ. संगीता सुरेश बुरुणकर, श्रीमती सविता राऊत, जावई सुरेश बुरुणकर, मुलगे संदीप खराडे, संदेश खराडे, नात जावई रोहित बोऱ्हाडे, सौ. दीपाली दिलीप टके, सौ.राजश्री हरेश टके, गजानन खराडे यांचे कौटुंबिक स्नेही अनंता निवाते, सौ. अनिता अनंत निवाते, आरोग्य खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी बिपिन सोष्टे, दिगंबर खराडे, पत्रकार ॲड. महेश पवार, पत्रकार अनिल पवार, मनोज टके, चेतन टके, सौ. प्रियांका मनोज टके, सौ. पायल चेतन टके, पंकज टके, सौ.ममता पंकज टके, कुमार नैमिष मनोज टके, कुमार ईशान चेतन टके, कुमार केयांश पंकज टके, कुमारी ख्याती पंकज टके, गजानन खराडे यांची नातवंडे ओंकार खराडे, आदित्य खराडे, शुभम बुरुणकर आदींसह अनेक मान्यवर, नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी आरोग्य खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी बिपिन सोष्टे यांनी गजानन खराडे यांच्या सेवकाळातील अनेक आठवणींना आणि त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा दिला.

गजानन खराडे यांनी १ ऑक्टोबर, १९६७ साली राजिपच्या आरोग्य खात्यात रोहा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोकबन येथे देवी डॉक्टर म्हणून सेवा सुरू केली. १९८२ पर्यंत कोकबन प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तांबडी, घोसाळे, भालगाव, विरजोली व परिसरात सेवा बजावताना त्यावेळी वाहतुकीची कोणतीही साधने नसतांना वाडी वस्त्यांवर, डोंगर, कपारीतील वस्त्यांवर पायी जाऊन लसीकरण मोहीम राबवून देवी या साथीच्या आजाराचे पूर्णता नायनाट करून रोग निर्मूलन करण्याची महत्वाची कामगिरी केली होती.

गजानन खराडे यांनी नंतर रोहा तालुक्यातीलच आंबेवाडी – कोलाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १९८२ ते २००७ या प्रदिर्घ काळात सेवा बजावतानाही देवी साथीच्या लसीकरणासह गावोगावी, वाडी वस्त्यांवर जाऊन तेथील विहिरींमध्ये व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये औषध टाकून पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून कावीळ, नारू या साथीच्या आजारांचे निर्मूलन करण्यासाठी प्रभावीपणे लसीकरण मोहीम राबविली होती. यांसह नवजात व लहान मुलांची शोधमोहीम गावोगावच्या पोलिस पाटील यांच्या सहकार्याने राबवून लहान मुलांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्याचे महत्त्वपूर्ण कामही गजानन खराडे यांनी केले होते. त्यासाठी त्यांचा आरोग्य खात्याकडून वेळोवेळी सन्मानही करण्यात आला होता. अशाप्रकारे आपल्या काळात सर्वोत्तम सेवा बजावणारे गजानन खराडे आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा समाजात मोठा वर्ग असून त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.