खेळमहाराष्ट्र ग्रामीण
बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या संस्कार वारगुडे याचे मूळ गावी ग्रामस्थांकडुन जल्लोषात स्वागत
खैरवाडी – सुकेळी ग्रामस्थांकडून जल्लोष

बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या संस्कार वारगुडे याचे मूळ गावी ग्रामस्थांकडुन जल्लोषात स्वागत
खैरवाडी – सुकेळी ग्रामस्थांकडून जल्लोष
दिनेश ठमके
नागोठणे : काठमांडू ( नेपाळ ) येथे ३० व ३१ मे रोजी झालेल्या आंतरराष्ट्रीय एशियन मिक्स बाॅक्सिंग चॅम्पियन २०२५ या स्पर्धेत रोहा तालुक्यातील सुकेळी ( खैरवाडी) येथिल ग्रामीण भागातील एका आदिवासी समाजातील ९ वर्षीय मुलगा कु. संस्कार योगेश वारगुडे याने भारताला सुवर्णपदक जिंकुन देत एक अभिमानास्पद व कौतुकास्पद कामगिरी करीत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळेच त्याच्या मूळ गावी सुकेळी (खैरवाडी) येथे रविवार ( दि१५) रोजी त्याच्या संपुर्ण टीमचे फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच डी जे लाऊन मुंबई -गोवा महामार्गावरील खैरवाडी थांब्यापासुन खैरवाडी गावापर्यंत जल्लोषात मिरवणूक काढुन सर्वांचेच स्वागत करण्यात आले. यावेळी संपुर्ण खैरवाडी गावामध्ये उत्साहमय वातावरण पसरले होते.
या मिरवणूक सोहळ्यासाठी टीमचे ग्रॅडमास्टर राकेश म्हसकर, प्रशांत मोहीते, विनायक सकपाळ, नीता म्हसकर, अश्विनी खराडे, सिद्धी सकपाळ, दुर्ती लाड यांच्यासह एशियन मिक्स बाॅक्सिंग स्पर्धा २०२५ चे विजेते स्पर्धक श्रेयश म्हसकर, संस्कार वारगुडे, स्मिथ सकपाळ, स्पर्श वांद्रे, यश जंगम, सार्थक मोरे, प्रशांत पोकळे, उत्कर्ष घाणेकर, स्वरांगी मोरे, दुर्वी घरटं, आदिया पलांडे, संजना कोळी, परी महाडीक, नेहा पवार, परी घरटं, क्रांती मोरे आदिंसह संस्कारचे वडील योगेश वारगुडे, आई संजिवनी वारगुडे, ऐनघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान शिद, माजी सरपंच गणपत हंबीर, यशवंत शिद, माजी सदस्य संतोष लाड, सामाजिक कार्यकर्ते मंगेश लाड, निवृत्त पोलिस अशोक हंबीर, अमोल हंबीर, तुकाराम वारगुडे, काशिनाथ शिद, कुशा शिद, भरत वारगुडे, भालचंद्र वारगुडे, देवजी हंबीर, ठमा वारगुडे, मधुकर शिद यांच्यासह खैरवाडी व विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.