महाराष्ट्र ग्रामीणवाहतूक

हायवे नाक्यावरील पुलाखाली कंपन्यांचे टाकाऊ पदार्थवाहू डंपर लावण्याच्या प्रकारात वाढ

टाकाऊ पदार्थांची घाण रहदारीच्या रस्त्यावर पडल्याने प्रदूषण व घाण 

हायवे नाक्यावरील पुलाखाली कंपन्यांचे टाकाऊ पदार्थवाहू डंपर लावण्याच्या प्रकारात वाढ

टाकाऊ पदार्थांची घाण रहदारीच्या रस्त्यावर पडल्याने प्रदूषण व घाण 
महेश पवार 
नागोठणे : नागोठण्यातील हायवेनाका परिसरात असलेल्या महामार्गावरील उड्डाण पुलाखाली कंपन्यांचे टाकाऊ पदार्थ वाहून नेणारे डंपर  तासनतास उभे करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ४ मे रोजी सकाळी असाच एक महाकाय डंपर (क्र. एम.एच.०६ बी.डी. १२९७)
पुलाखाली उभा करून चालक अनेक तास गायब झाला होता. तोपर्यंत त्या डंपरमध्ये द्रव स्वरूपात असलेला टाकाऊ पदार्थ डंपर मधून गळती होऊन मोठ्या प्रमाणात उड्डाण पुलाखाली रहदारीच्या रस्त्यावर पडल्याने तेथे घाण तसेच प्रदूषण झाले होते.
उड्डाण पुलाखाली उभ्या असलेल्या डंपरच्या चालक व वाहक बसत असलेल्या दोन्ही बाजूला असलेले डंपरचे दरवाजे वा इतर ठिकाणी वाहन मालकाची माहिती दिसून आली नाही. मात्र या डंपरच्या दर्शनी भागात “धावीर इंटरप्रायजेस” व बाजूला फालक्यावर HZARDS OUS WASTE असे लिहिलेले असल्याने हा डंपर रोहा भागातील असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीमधील कोणत्यातरी कंपनीतून हा डंपर कंपनीतील हजार्ड्स वेस्ट असलेला धोकादायक द्रव स्वरूपातील टाकाऊ पदार्थ घेऊन कुठेतरी जात असावा असा प्राथमिक अंदाज आहे. 
दरम्यान हा डंपर या उड्डाण पुलाखाली उभा केला तेव्हा तेथे उपस्थित असलेली नागरिकांनी व रिक्षा चालकांनी डंपर चालकाला त्या ठिकाणी डंपर उभा न करण्याविषयी सांगितले. मात्र सदर डंपर चालक हा नागोठण्याजवळील एका गावातीलच असल्याने त्याने संबंधितांना उर्मट भाषा वापरून तो तेथेच डंपर उभा  करून निघून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे अशा डंपरच्या मालकावर तसेच बेशिस्त चालकावरही आरटीओ तसेच पोलिस खात्याने कारवाई करावी अशी मागणी हायवे नाका येथील नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!