मनोहरभाई सुटे यांच्या वाढदिवसानिमित्त ऐनघर विभागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

मनोहरभाई सुटे यांच्या वाढदिवसानिमित्त ऐनघर विभागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
दिनेश ठमके
सुकेळी : नामदार भरतशेठ गोगावले यांचे खंदे समर्थक मानले जाणारे तसेच ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य व विभागातील राजकारणातले किंगमेकर अशी ओळख असलेले मनोहरभाई सुटे यांचा वाढदिवस रविवार ( दि.१५) रोजी जल्लोषमय व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणा-या अनेक हितचिंतकांनी उपस्थित राहुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
मनोहरभाई सुटे यांच्या या वाढदिवसाचे औचित्य साधत एक सामाजिक बांधिलकी जपत ऐनघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये असणा-या १० ते १२ प्राथमिक शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून वह्या, पेन या शालेय साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. सद्यस्थितीत बाजारात शाळेत साहित्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच ऐनघर विभागातील शाळांमध्ये आदिवासी समाजाचे अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पंरतु याच गरजु आणि गरीब विद्यार्थ्यांना मनोहर सुटे यांनी शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करीत मायेचा आधार देत सर्वांसमोर एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी सुकेळी प्राथमिक शाळेतुन मंगळवार ( दि.१७) रोजी वह्या व पेन वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी सुटे यांच्यासाठी टाळ्या वाजवत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला मनोहरभाई सुटे यांच्यासह ऐनघर ग्रामपंचायतीचे उपसरपंच भगवान शिद, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र धामणसे, हॉटेल आशिर्वादचे मालक संतोष शेठ खाडे, भारत सुटे, गणेश सुटे, खेळु गायकर, सुरेश वाघमारे यांच्यासह सर्वच प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.