आरोग्यखेळमहाराष्ट्र ग्रामीण

नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक योग दिन साजरा

कुमारी मीरा राकेश टेमघरे यांनी उपस्थितांना दिले योगाचे धडे 

नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक योग दिन साजरा

कुमारी मीरा राकेश टेमघरे यांनी उपस्थितांना दिले योगाचे धडे 
महेश पवार 
नागोठणे :  जगभरात २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो.  यावर्षी अकरावा योग दिन साजरा करण्यात येत आहे. आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा आणि योग, योगासने त्याचबरोबर योग साधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून योगाचे महत्त्व त्याचे फायदे योगासनाची गरज पटवून देण्यात आली आहे. शारीरिक, मानसिक अध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खूप गरजेचे आहे.
या योगा दिनाची सुरुवात प्रथम आपल्या भारतात झाली जो आजच्या घडीला संपूर्ण जग साजरा करत आहे. याच धर्तीवर आज जागतिक योग दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  यावेळी  कुमारी  मीरा राकेश टेमघरे यांनी उपस्थितांना योगाचे धडे दिले. यावेळी मीरा टेमघरे यांनी उपस्थितांकडून विविध प्रकारचे योगासने व प्राणायाम करून घेतले.  त्यामुळे सर्व उपस्थितांमध्ये वेगळ्याच प्रकारचा उत्साह पाहायला मिळाला.
सकाळी ठीक साडेसात वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमाला नायब तहसीलदार उज्वला अंधारे, मंडळ अधिकारी रमेश म्हात्रे, नागोठणे सजाचे तलाठी प्रवीण साळुंके, नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे, सरपंच सौ. सुप्रिया संजय महाडिक, ग्रामपंचायत सदस्या अमृता महाडिक,  भाविका गिजे, भरत गीजे, श्रीकांत रावकर, शैलेश रावकर, निलोफर पानसरे, नम्रता माने यांच्यासह  ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!