नोकरी विशेषमहाराष्ट्र ग्रामीण

रिलायन्स विरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्त बुधवारी आझाद मैदानात धडकणार 

नोकरी मिळण्यासाठी आझाद मैदानात प्रकल्पग्रस्त करणार बेमुदत उपोषण 

रिलायन्स विरोधात स्थानिक प्रकल्पग्रस्त बुधवारी आझाद मैदानात धडकणार 

नोकरी मिळण्यासाठी आझाद मैदानात प्रकल्पग्रस्त करणार बेमुदत उपोषण 
महेश पवार 
नागोठणे :  वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन प्रणित, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था, चोळे ते नागोठणे ता. रोहा, पेण, जि. रायगड येथील रिलायन्स इंडस्ट्रीज मधील प्रकल्पग्रस्त बुधवार दिनांक ११ जून रोजी सकाळी १०.३० वाजता वंचित बहुजनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथील आझाद मैदानात धडकणार आहेत. यावेळी सर्व प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व ॲड. संदेश मोरे यांच्या मार्गदर्शनात  मा. मुख्यमंत्री कार्यालयामधून रिलायन्स नागोठणे कंपनी प्रकल्पबाधीत प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना कायमस्वरूपी नोकरी संदर्भात बैठक लावण्यात चाल ढकल होत असल्याने मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागणीचा गांभीर्याने व तत्काळ विचार करावा यासाठी मुंबईतील आझाद मैदानात ठिय्या मांडण्याचा व बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय संघटनेकडून  घेण्यात आला आहे.
बुधवार दिनांक ११ जून २०२५ पासून होणारे हे  बेमुदत आमरण उपोषण आझाद मैदान मंत्रालय मुंबई येथे सकाळी ठीक १० : ३० वाजता सुरू होणार असून आपल्या न्याय्य हक्कासाठी सर्व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारक यांनी कोणताही कारण न सांगता तसेच प्राधान्य प्रमाणपत्र धारक यांनी प्रत्येकी एक व्यक्ती आझाद मैदान मुंबई येथे हजर रहावे. तसेच  येताना प्रत्येकाने प्रत्येकाची सोय करावी व रात्री राहण्याची सोय आंबेडकर भवन दादर येथे केली जाईल आणि प्रमाणपत्र धारकाची प्रत्येक व्यक्तींची दोन वेळा हजेरी घेतली जाईल. जो हजर राहील त्याचाच विचार केला जाईल असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आझाद मैदानातील या आंदोलनासाठी “एक तर आम्हाला रिलायन्स नागोठणे कंपनीत कायमस्वरुपी नोकऱ्या दया, नाही तर आमच्या जमिनी परत करा !” आणि “प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो” या दोन घोषणा देण्याचे ठरविण्यात आले आहे.  आझाद मैदानातील या उपोषणासंदर्भात महाराष्ट्र राज्य युनियनचे सरचिटणीस सुरेश मोहिते, भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था, चोळे ते नागोठणेचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने, उपाध्यक्ष रोशन जांबेकर, सचिव राकेश जवके, संपर्क प्रमुख रायगड कु. रूपा भोईर आदी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!