महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
शेकापच्या विविध कार्यकारिणीमध्ये नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांची निवड
पक्ष संघटना मजबूत करण्याचा नवीन पदाधिकाऱ्यांचा निर्धार

शेकापच्या विविध कार्यकारिणीमध्ये नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांची निवड
पक्ष संघटना मजबूत करण्याचा नवीन पदाधिकाऱ्यांचा निर्धार
महेश पवार
नागोठणे : शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा निवड मेळावा पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेझारी येथील भव्य प्रांगणात नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यात जिल्हा कार्यकारणीसह रोहा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून शेतकरी कामगार पक्षाच्या नागोठणे शहर व नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्ष नागोठणे शहर व विभागात मजबूत करण्याचा निर्धार सर्व नवीन पदाधिकाऱ्यांनी केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा चिटणीस मंडळामध्ये नागोठण्यातील तुकाराम गणपत खांडेकर (गुरुजी) यांची तर रायगड जिल्हा महिला आघाडी सदस्य म्हणून सौ कांचन दीपक माळी (आंबेघर) यांची निवड करण्यात आली आहे. रोहा तालुका चिटणीस सदस्य म्हणून राजू तेलंगे (बाळसई) व गणपत डाकी (शेतपळस) यांची निवड करण्यात आली आहे. रोहा तालुका विभागीय चिटणीसपदी प्रवीण जांबेकर (आमडोशी) यांची रोहा तालुका महिला आघाडी सदस्यपदी सौ. सुनीता जितेंद्र माळी (निडी) व सौ. समीक्षा यशवंत यादव (नागोठणे) यांची निवड करण्यात आली आहे. रोहा तालुका पुरोगामी युवक संघटना सदस्यपदी अरुण चोगले (नागोठणे), रोहा तालुका कामगार आघाडी सदस्यपदी दीपक माळी (आंबेघर), रोहा तालुका अल्पसंख्यांक आघाडी उपाध्यक्ष म्हणून नाझीम सय्यद (नागोठणे) तर रोहा तालुका मच्छीमार आघाडी सदस्यपदी सुधीर पारंगे (वेलशेत) यांची निवड करण्यात आली आहे. शेकापचा नागोठणे विभागातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.