धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणराजकारण
शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची प्रवृत्ती ज्यांच्याकडे होती ते व्यक्तिमत्व म्हणजे तात्यासाहेब टके : ह.भ.प. नरेश महाराज जाधव
स्व.तात्यासाहेब टके यांची २५ वी पुण्यतिथी धार्मिक कार्यक्रमाने साजरी

शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची प्रवृत्ती ज्यांच्याकडे होती ते व्यक्तिमत्व म्हणजे तात्यासाहेब टके : ह.भ.प. नरेश महाराज जाधव
स्व.तात्यासाहेब टके यांची २५ वी पुण्यतिथी धार्मिक कार्यक्रमाने साजरी
नागोठणे : कै. तात्यासाहेब टके यांचे शिक्षण जरी कमी होते तरी त्यांचे विचार व त्यांची दूरदृष्टी उच्च शिक्षितांपेक्षाही जास्त व त्यांना लाजवेल अशी होती. त्यांनी आपल्याकडे कोणतेही काम, कोणतीही समस्या घेऊन येणाऱ्या तळागाळातील व्यक्तीला कशाप्रकारे मदत करता येईल व त्याला कशाप्रकारे न्याय मिळवून देता येईल आणि दुःखी व्यक्तीस कसे सुखी करता येईल यासाठी त्यांनी सैदैव प्रयत्न केले. त्यांच्याकडे मदत व न्याय मागायला आलेला मग तो, मित्र असो वा शत्रू, गरीब असो वा श्रीमंत, हिंदू असो वा मुस्लिम तसेच आपला व परका असा भेदभाव कधीच न करता त्यांनी सर्वांनाच योग्य असा न्याय दिला व शेवटपर्यंत देत राहिले. म्हणूनच शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची प्रवृत्ती ज्यांच्याकडे होती ते व्यक्तिमत्व म्हणजे तात्यासाहेब टके असे गौरवोद्गार जंबोशी–पेण येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. नरेश महाराज जाधव यांनी आपल्या प्रवचनात काढले.

खासदार सुनिल तटकरे यांचे कौटुंबिक स्नेही व राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागातील नेते भाई टके व हरीश टके यांचे वडील, स्व. दत्ताजीराव तटकरे यांचे कौटुंबिक स्नेही आणि नागोठण्यातील तत्कालीन दिवंगत थोर समाजसेवक तात्यासाहेब टके यांची २५ वी पुण्यतिथी बुधवार दि. १८ जून रोजी भाई टके यांच्या पांडुरंग निवास, नागोठणे येथे सकाळी १० ते १२ वा.दरम्यान कीर्तन व प्रवचन कार्यक्रमाने भक्तिमय व धार्मिक वातावरणात साजरी झाली. त्यावेळी मोठ्या संख्येने असलेल्या उपस्थितांसमोर स्व. तात्यासाहेब टके यांच्या कार्याची महती व त्यांच्या आठवणींना आपल्या प्रवचनाद्वारे उजाळा देताना ह.भ.प. नरेश महाराज जाधव बोलत होते.

नागोठण्यातील तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते स्व. तात्यासाहेब उर्फ पांडुरंग गोविंद टके यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित प्रवचनापूर्वी स्व. तात्यासाहेब टके व स्व. रुख्मिणी टके यांची विधिवत पुजा अर्चा व कलश पुजन भाई टके व सौ. दिपाली टके यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. या धार्मिक कार्यक्रमाला हभप नरेश महाराज जाधव, स्व. तात्यासाहेब टके यांचे सुपुत्र दभाई टके, हरीश टके, स्नुषा सौ. दीपाली दिलीप टके, सौ. कल्पना हरीश टके व जावई प्रमोद मुकादम यांच्या समवेत राष्ट्रवादीचे नेते रजिप माजी सदस्य नरेंद्रशेठ जैन, नागोठणे सरपंच सुप्रियाताई संजय महाडिक, मनसे नेते गोवर्धनभाई पोलसानी, राष्ट्रवादीचे नेते शिवरामभाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, डॉ. राजेंद्र धात्रक, हरीशशेठ काळे, नागोठणे माजी सरपंच विलास चौलकर, नागोठण्याचे पहिले लोकनियुक्त सरपंच व विद्यमान सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, मारुती देवरे, माजी सरपंच प्रकाशशेठ जैन, माजी सरपंच लियाकतशेठ कडवेकर, अनिलशेठ काळे, रजिप माजी सदस्य नंदुशेठ म्हात्रे, चंद्रकांत गायकवाड, राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष सिराजभाई पानसरे,सचिन कळसकर, जुगनशेठ जैन, डॉ. सुनिल पाटील, डॉ. रोहिदास शेळके, डॉ. नरेश सोष्टे, डॉ. अभिषेक शहासने, बिपीन सोष्टे, दिलीप शहासने, रुचिर मोरे, नाना तेरडे, भाऊ मोरे,

उल्हास शिंदे, मंगेश तेरडे, विठोबाशेठ दंत, पांडुरंग म्हात्रे, सुभाष पाटील, नथुराम म्हात्रे, हभप तुकाराम राणे, हभप विजय शहासने, हभप रमेश तुरे, उदंड रावकर, शैलेश रावकर, जयराम पवार, मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंखे, सुनिल लाड, विवेक रावकर, दिगंबर खराडे, रविंद्र टके, बाळाराम पोटे, दिनेश घाग, बाबू घाग, संजय रजिवले, मिलिंद गुजर, अशोक जाधव, ऍड. श्रीकांत रावकर, ऍड. रमेश जाधव, प्रमोद जांबेकर,मधुकर मढवी, सिद्धेश ठोंबरे,संदेश पाटील, मिलिंद गुरव, भारत भोय, किसन भोय, सुभाष भोय, प्रकाश मेस्त्री, मच्छिंद्र साळुंखे, अशोक गुरव, जगदीश दिवेकर, शरद जाधव, पप्या भोपी, गणपत दिवेकर, सुशील टके, प्रल्हाद घाडगे, केतन भोय, पवित्र पोलसानी, नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार, अध्यक्ष ऍड. महेश पवार, सचिव अनिल पवार, सहसचिव राजेंद्र जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस महिला नेत्या रिचा धात्रक, सुजाता जवके, प्रतिभा तेरडे, ग्रामपंचायत सदस्या शबाना मुल्ला, पूनम काळे, गुड्डू मोदी, जयवंत गायकर, प्रमोद गायकर, स्वयम गायकर, ओम गायकर, संतोष गुडे, स्व.तात्यासाहेब टके यांच्या मुली उषा जाधव, सुमन खराडे, नातवंडे – सौ. जान्हवी लोकेश पंडित, मनोज टके, प्रियांका मनोज टके, चेतन टके, पायल चेतन टके, पंकज टके, ममता पंकज टके, जयेश टके, आशु जाधव, जितेंद्र जाधव, सौ. भक्ती जितेंद्र जाधव, जितेश म्हात्रे, पूनम जितेश म्हात्रे, महेश बेंद्रे, तृप्ती महेश बेंद्रे, आका जाधव, अरुणा रसाळ, अपर्णा पवार, अर्चना शिंदे, सुजाता पवार, दीक्षिता पवार, अनिष्ठा म्हात्रे, शैला कदम, मंगल इंदुलकर, संगिता मुरूमकर, निकिता मोरे, नलिनी पवार, जना पवार, अल्का टके, मीना जाधव, कुसुम मोरे,ओंकार रसाळ, साधना खराडे, सुरेखा खराडे, बाळू खराडे, उमेद जाधव, पतवंडे – कु. नैमिश मनोज टके, ईशान चेतन टके, खियांश पंकज टके, ख्याती पंकज टके यांच्यासह तात्यासाहेब टके यांच्यावर प्रेम करणारे ग्रामस्थ, दिलीपभाई टके व हरीशभाई टके यांचा मित्रपरिवार व कौटुंबिक स्नेही बहुसंख्येने उपस्थित होते.