महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
शिक्षण हे वाघिणीचे दुध, जो प्यायला तो गुरगुरनारच : सपोनि सचिन कुलकर्णी
प्राईम माईंड्स इंग्लिश मिडीयम स्कुलचे उद्घाटन

शिक्षण हे वाघिणीचे दुध, जो प्यायला तो गुरगुरनारच : सपोनि सचिन कुलकर्णी
प्राईम माईंड्स इंग्लिश मिडीयम स्कुलचे
उद्घाटन
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या दफेदार एज्युकेश ट्रस्टच्या प्राईम माईंड्स इंग्लिश मिडीयम स्कुलच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती घडण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. या स्कुलने लावलेल्या रोपट्याचे लवकरच वटवृक्षात रूपातर होईल. या स्कुल मधून चांगली हुशार मुले बाहेर पडणार असून त्यांच्या हातून देशभक्ती व सामाजिक कार्य पार पडणार आहेत. शिक्षणामुळे चांगले नागरिक उदयास येत असतात. या स्कुलच्या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण मिळणार आहे. शिक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक मुलांनी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दुध असून जो ते प्यायला तो समाजात अन्यायाच्या ठिकाणी गुरगूरल्या शिवाय राहणार नाही असे उदगार नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी काढले.

नागोठणे बाजारपेठ मधील दफेदार एज्युकेश ट्रस्टच्या प्राईम माईंड्स इंग्लिश मिडीयम स्कुलच्या प्ले ग्रुप, नर्सरी, जुनिअर आणि सिनियर केजी या वर्गांचे उदघाटन पोलीस अधिकारी सचिन कुलकर्णी व नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले त्यावेळी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना सचिन कुलकर्णी बोलत होते. यावेळी श्रीमती शिला मोदी, दफेदार एज्युकेश ट्रस्टचे चेअरमन असिफ दफेदार, डॉ. अजहर दफेदार, उर्दू स्कुलचे सचिव लियाकतशेठ कडवेकर, ग्रामपंचायत उपसरपंच अकलाख पानसरे, सदस्या शबाना मुल्ला, सद्दाम दफेदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, सागिर अधिकारी, पप्पूशेठ अधिकारी, जहूरुद्दीन सय्यद, कडसुरे उपसरपंच रविंद्र शिर्के, डॉ. रोहिदास शेळके, बाबा मुल्ला, मुब्रा ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते निसार खान, असिफ मुल्ला, ला. विवेक सुभेकर, ला. यशवंत चित्रे, ला. दौलत मोदी, अष्टविनायक पतसंस्थेचे संचालक रोहिदास हातनोलकर, इर्षाद कुनके, पप्पू हाफिज, रोशन पारंगे,मनोज ताडकर, एजाज मोहने, अतिक अन्सारी सर, मुजफ्फर कडवेकर, डॉ. अमिता मोदी, डॉ. सादिया दफेदार, डॉ. तंदिका दफेदार, जावेद दफेदार, फजल दफेदार, रमीज दफेदार, संदेश बैकर, गौतम जैन, मदन गायकर आदी मान्यवरांसह नागोठणे शहर व विभागातील शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल शेख यांनी तर आभार प्रदर्शन स्कुलचे चेअरमन असिफ दफेदार यांनी केले.