खेळमहाराष्ट्र ग्रामीण

सुकेळी (खैरवाडी) येथिल आदिवासी समाजाचा संस्कार वारगुडे याने पटकावले एशियन बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

इंग्लंड येथे होणा-या वर्ल्ड मिक्स बाॅक्सिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड

सुकेळी (खैरवाडी) येथिल आदिवासी समाजाचा संस्कार वारगुडे याने पटकावले एशियन बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक

इंग्लंड येथे होणा-या वर्ल्ड मिक्स बाॅक्सिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी निवड
दिनेश ठमके 
सुकेळी : काठमांडू (नेपाल) येथे ३० व ३१ मे रोजी संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय एशियन मिक्स बाॅक्सिंग चॅम्पियन २०२५ च्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुकेळी (खैरवाडी) येथिल आदिवासी समाजातील ९ वर्षीय मुलगा कु. संस्कार योगेश वारगुडे याने भारताला सुवर्णपदक जिंकुन देत एक अभिमानास्पद व कौतुकास्पद कामगिरी करीत देशाचे नाव मोठे केले आहे.
आंतरराष्ट्रीय मिक्स बाॅक्सिंग स्पर्धा काठमांडू (नेपाल)  या ठिकाणी नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अनेक देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यामध्ये नागोठण्याजवळील सुकेळी  (खैरवाडी) येथिल कु. संस्कार योगेश वारगुडे याने  ग्रॅण्ड मास्टर राकेश म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारताचे प्रतिनिधित्व करत भारताला सुवर्णपदक जिंकुन देत देशाची तसेच रायगड जिल्ह्याची शान वाढावली आहे. कु. संस्कार याने याआधीही अनेक स्पर्धेत पदके प्राप्त केली आहेत.  तसेच यापुढे इंग्लंड  येथे होणा-या वर्ल्ड मिक्स बाॅक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याची निवड झाल्याबद्दल संस्कार यांचे सर्वच स्तरातून कौतुकांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!