निधनमहाराष्ट्र ग्रामीण
तारामती कावेडिया यांचे निधन

तारामती कावेडिया यांचे निधन
नागोठणे : नागोठणे बाजारपेठेतील रहिवासी तारामती अनुपचंद कावेडिया जैन (वय ९३) यांचे शुक्रवार दिनांक ३० मे रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास तळेगाव(पुणे) येथील पवना मल्टिस्पेसिलिटी हॉस्पिटल मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. नागोठण्यातील प्रसिद्ध व्यापारी संतोष अनुपचंद कावेडिया जैन यांच्या त्या मातोश्री होत. कै. तारामती कावेडिया यांच्या पश्चात संतोष, सागर, मनोज व प्रवीण हे चार मुलगे, दोन विवाहित मुली बबिता मनोहर मेहता, अर्चना कमलेश जैन, जावई, सून, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत तारामती अनुपचंद कावेडिया जैन यांच्या पार्थिवावर नागोठण्यातील अंबा घाटावरील वैंकुठ स्मशानभूमीत शनिवारी(दि.३१) दुपारी १२.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नागोठणे बाजारपेठेतील व्यापारी वर्ग, नागोठणे विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागोठण्यातील नागरिक तसेच कावेडिया परिवारातील नातेवाईक, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.




