आमडोशी येथिल सरिता सुतार यांचे अल्पशा आजाराने निधन

आमडोशी येथिल सरिता सुतार यांचे अल्पशा आजाराने निधन
दिनेश ठमके
सुकेळी : नागोठणे जवळच असलेल्या आमडोशी येथिल सरिता पांडुरंग सुतार यांचे बुधवार ( दि.१६) रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे ७५ वय होते. त्यांच्यावर आमडोशी येथिल वैकुंठभुमीत सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेला विविध क्षेत्रातील मान्यवर व विभागातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै.सरीता सुतार यांचा अल्प परिचय द्यायचा झाला तर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे शेती व्यवसाय करण्यात घालवले. आपल्या संपूर्ण कुटुंबाला त्यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभले. स्वभावाने अतिशय मनमिळाऊ व शांत असलेल्या कै. सरिता यांच्या निधनाने संपूर्ण सुतार परिवार पोरका झाला आहे. त्यांच्या पश्चात पती पांडुरंग सुतार, मुले लक्ष्मण व अनिल, मुलगी मोनिका सुतार तसेच सुना, नातवंडे असा मोठा सुतार परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शुक्रवार ( दि.१) रोजी आमडोशी येथिल माणकेश्वर मंदिराच्या बाजूला तर उत्तरकार्य सोमवार ( दि.४) रोजी राहत्या घरी आमडोशी येथे होणार असल्याचे सुतार कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.