गुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण
बेपत्ता तरुण सुभाष कुंबेफळकर यांची माहिती देण्याचे आवाहन

बेपत्ता तरुण सुभाष कुंबेफळकर यांची माहिती देण्याचे आवाहन
महेश पवार
नागोठणे : रसायनी पोलीस ठाणे मधील मनुष्य मिसिंग रजि.नंबर २३/२०२५ मधील मिसिंग व्यक्ती सुभाष लिंबाजी कुंबेफळकर, वय ४३ वर्षे सध्या रा. गोकुळ नगरी सोसायटी, रिस, ता.खालापूर जि.रायगड मुळ रा. आंबेजोगाई बीड हे दिनांक ३० जून, २०२५ रोजी आपल्या घरात गावी जातो असे सांगून निघून गेले आहेत. ते त्यांचे गावी पोहचले नाहीत. यासंदर्भात सौ. ज्योती सुभाष कुंबेफळकर यांनी रसायनी पोलीस ठाण्यात आपले पती हरविल्याची फिर्याद दाखल केली आहे. तेव्हा सदरची मिसिंग व्यक्ती ही आपणा कोणास कोठे भेटल्यास किंवा दिसल्यास त्या बद्दल रसायनी पोलीस स्टेशन मध्ये प्रभारी अधिकारी संजय बांगर मो.नंबर ९०१११२९९९४ आणि हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील यांना मो.नंबर ९५२७१७३२७३/९४७०८५५२३४ यावर माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.




