आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
डॉ. अजय चंदनवाले यांची डॉ. सुनील पाटील यांच्या निवासस्थानी भेट
सदिच्छा भेटीने डॉ. सुनील पाटील भारावले

डॉ. अजय चंदनवाले यांची डॉ. सुनील पाटील यांच्या निवासस्थानी भेट
सदिच्छा भेटीने डॉ. सुनील पाटील भारावले
महेश पवार
नागोठणे : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर, मुंबईचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी कोकणामध्ये कामानिमित्त जात असताना नागोठण्यातील मायलक्ष्मी नर्सिंग होमचे संचालक व येथील प्रथितयश डॉक्टर सुनील पाटील यांच्या निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉ. अजय चंदनवाले यांनी वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयांवर डॉ. सुनील पाटील यांच्याशी चर्चा करून मार्गदर्शन केले. डॉ. अजय चंदनवाले हे आमच्या निवासस्थानी येणे हे आमच्यासाठी गौरवाचे व आनंदाचे क्षण होते अशी प्रतिक्रिया डॉ. सुनील पाटील यांनी व्यक्त केली आहे. डॉ. अजय चंदनवाले यांच्या या सदिच्छा भेटीच्या वेळी डॉ. गीता सुनील पाटील, डॉ. सुनील पाटील यांच्या शिक्षिका असलेल्या बहीण संगीता पाटील आदींसह डॉ. सुनील पाटील यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
