ह.भ.प. कृष्णा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

ह.भ.प. कृष्णा पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
महेश पवार
नागोठणे : रिटघर (ता. पनवेल) येथील रहिवासी व गावतील वारकरी सांप्रदाय तसेच ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख आधारस्तंभ ह.भ.प. कृष्णा राजाराम पाटील यांचे २१ जुलै रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत कृष्णा पाटील यांच्या पार्थिवावर रिटघर येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंकस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, त्यांचे नातेवाईक, विभागातील नागरिकांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत कृष्णा पाटील यांच्या पश्चात विवाहित मुलगे प्रकाश, कृष्णा, एक विवाहित मुलगी सुगंधा भगत, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. खुपच प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे तसेच सर्वांच्या मदतीला नेहमीच धावून जाणारे कृष्णा पाटील यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत कृष्णा पाटील यांचे दशक्रिया विधी बुधवार दिनांक ३० जुलै रोजी नाशिक येथे तर उत्तरकार्य विधी (तेरावे) शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी रिटघर येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याने यानिमित्ताने सकाळी १० ते १२ वा. दरम्यान ह.भ.प. लक्ष्मण महाराज (मोहो) यांचे कीर्तन होणार असल्याचे पाटील कुटूंबियंकडून सांगण्यात आले.