महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

“जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर”च्या माध्यमातून “विठ्ठलरुपी बळीराजास” आषाढी एकादशीला मोफत फवारणी पंप चे वाटप

“जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर”च्या माध्यमातून “विठ्ठलरुपी बळीराजास” आषाढी एकादशीला मोफत फवारणी पंप चे वाटप

महेश पवार 
नागोठणे : जायन्ट्स ग्रुप अमळनेरच्या माध्यमातून तालुक्यातील अल्पभूधारक (२ बिघ्या पेक्षा कमी शेती) तसेच कोरडवाहू शेती,व निर्व्यसनी शेतकरी अशा १० होतकरू शेतकऱ्यांची अभ्यासपूर्ण निवड जायंट्स ग्रूप चे सदस्य प्रोजेक्ट चेअरमन रविंद्र घनश्याम पाटील व संस्थापक जायंट्स अध्यक्ष सुनील पाटील यांनी केल्यानंतर त्यांना आषाढी एकादशीचे औचित्य साधून मोफत कीटकनाशक औषधी फवारणी पंप वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम प्रगती कोचिंग क्लासेस, पवन चौक, अमळनेर या ठिकाणी संपन्न झाला. या लोकपोयोगी कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून समस्त शेतकरी वर्गाकडून जायन्ट्स ग्रुप अमळनेर च्या पदाधिकारी व सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवा निवृत्त प्रा. यु जी देशपांडे सर ( जेष्ठ मार्गदर्शक जायन्ट्स ग्रुप अमळनेर) यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. पी. आर भावसार सर व कर्जत तालुक्याचे बी.डी.ओ (जि. रायगड ) तथा जायन्ट्स ग्रुप अमळनेरचे सदस्य सुशांत आप्पा पाटील तसेच जायन्ट्स ग्रुप अध्यक्ष डॉ सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
आषाढी एकादशीला संपूर्ण वारकरी समुदाय, शेतकरी, कष्टकरी, पंढरीच्या विठोबाच्या चरणी लीन होतात. आषाढीची वारी प्रत्येकाला च करणे शक्य होतेच असं नाही. म्हणून धडपडणाऱ्या जायन्ट्स ग्रुप च्या सदस्यांनी आपल्या सेवेतच बळीराजाच्या रूपात”विठ्ठल माऊली”आहे हे मानून गरीब,होतकरू, अल्पभूधारक, निर्व्यसनी शेतकऱ्यांची निवड करून त्यांना फवारणीचे पंप वाटप केले. जायन्ट्स ग्रुप साठी बाहेरून कुठलाही आर्थिक निधी अथवा फंड मिळत नाही,पण आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतोच या उदात्त हेतूने प्रत्येक कार्य असो वा सेवा सर्व सदस्य मिळून स्वखर्चाने करत असतात अशी माहिती जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरचे संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील यांनी देऊन आषाढी एकादशी सारख्या पवित्र दिवसाला आम्हाला शेतकरी बांधवांमध्ये विठुराया बघावयास मिळाला. “अतिथी देवो भव” या उक्तीप्रमाणे ,व वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना , वेफर्स,राजगिरा लाडू , केळी हा उपवासाचा फराळ,चहा पाना सोबत देण्यात आल्याचे देखील सुनील पाटील यांनी सांगितले.
फवारणी पंप वाटपामध्ये जे सेवारुपी शेतकरी होते त्यात दिलीप रावण पाटील (ढेकू सिम ),प्रकाश मोहन संदानशिव (पातोंडा ),पंडित रामराव पाटील( सोनखेडी ),भागवत युवराज पाटील ( रामेश्वर ), मुन्ना सर्जेराव पाटील (अमळनेर),विश्वास भटा पाटील (गलवाडे ),दिपक शांताराम पाटील (ढेकू सिम),भरत हिलाल पाटील (कन्हेरे ),
देवराम यशवंत चौधरी ( जळोद),भगवान पांडुरंग सोनवणे (फाफोरे) या शेतकऱ्यांचा समावेश आहे.
आपण आम्हाला ज्या भावनेतून फवारणी पंप चे वाटप केले आहेत व तोच लोकसेवेचा निर्धार लक्षात घेऊन आम्हीसुद्धा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनाआमच्याकडून मदत करता येईल, त्या शेतकऱ्यांपर्यंत ही वस्तू सेवा रूपाने पोहोचविण्याचा आम्हीही प्रयत्न करू व आपला वाटपाचा उद्देश निश्चित सफल करूअसा निर्धार जळोद येथील युवा शेतकरी पुत्र देवराम यशवंत चौधरी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संदीप महाजन सर यांनी करून एक कुशल सूत्रसंचलन करते असल्याचे दाखवून दिले.
हा लोकपोयोगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेरचे अध्यक्ष सुनील पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र भावसार, उपाध्यक्ष डॉ.महेश पाटील, सचिव संदीप महाजन, खजिनदार राजेंद्र पाटील, अँड राजेंद्र चौधरी, महेश पाटील, रमेश महाजन, , डॉ निलेश शिंगाणे, रवींद्र पाटील, भटू पाटील,संतोष वाघ ,प्रदीप शिंगाणे ,संजय मुंडके, अश्विन पाटील, चंदुलाल बड गुजर सर,प्रो. ए. एम. करमपूरवाला, प्रशांत भटू पाटील यांच्यासह जायन्ट्स ग्रुपचे सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!