महाराष्ट्र ग्रामीणराजकारणवाढदिवस
खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कडसुरे येथील माऊली हरिपाठ मंडळाला सतरंजीचे वाटप

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कडसुरे येथील माऊली हरिपाठ मंडळाला सतरंजीचे वाटप
महेश पवार
नागोठणे : रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कडसुरे येथील माऊली हरिपाठ मंडळाला सतरंजीचे वाटप करण्यात आले. कडसुरे मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ग्रामस्थ मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष व रोहा पंचायत समितीचे माजी सभापती शिवरामभाऊ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष व पिगोंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोषभाई कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा व रोहा पंचायत समितीच्या माजी सदस्या अमिताताई शिंदे, महीला जिल्हा सरचिटणीस आशाताई शिर्के, पाटणसई ग्रामपंचायतीचे सदस्य तथा नागोठणे विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर, नागोठणे विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव व कडसुरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे, कडसुरे येथील वारकरी संप्रदायाचे प्रमुख सुरेश महाराज शिर्के, हिराचंद शिर्के, ज्ञानदेव शिंदे, अनिल शिंदे, धाकू शिर्के, संतोष शिंदे, बाळाराम शिंदे, संभाजी शिर्के, प्रकाश शिर्के, दौलतदादा गोविलकर, विठोबा गावंडकर, काशीराम शिंदे, सदाशिव शिंदे, शिवाजी नाकाते, दिनेश शिर्के, नमेश शिर्के, योगेश शिंदे, प्रतीक शिंदे, वैभव शिंदे, मंगेशबुवा शिंदे, अंबाजी शिंदे, लखमा जाधव, शांताराम जाधव, बाळकृष्ण देवरे आदींसह कडसुरे ग्रामस्थ व महिला मंडळ यावेळी उपस्थित होते. 
