महाराष्ट्र ग्रामीणराजकारणवाढदिवस

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्लँकेट व बेडशीटचे वाटप 

प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना केले फळांचे वाटप

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्लँकेट व बेडशीटचे वाटप 
प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना केले फळांचे वाटप
नागोठणे शहर व विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम 
महेश पवार
नागोठणे : रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागोठणे शहर व विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागोठणे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी १२ ब्लँकेट, १२ बेडशीट व बारा उशींचे वाटप करण्यात आले. नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांनी हे साहित्य स्वीकारले. याशिवाय नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळांचे वाटपही यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदार संघाचे उपाध्यक्ष विलास चौलकर यांनी आपल्या मनोगतात खा. सुनील तटकरे साहेबांचा वाढदिवस नागोठणे शहर व ग्रामीण विभागातील आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी विविध उपक्रमांनी  उत्साहात साजरा करायचा असून साहेबांना दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांनीही नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रास ब्लँकेट व बेडशीट दिल्याबद्दल आभार व्यक्त करून खा. सुनील तटकरे यांना आरोग्य केंद्राच्या वतीने शुभेच्छा दिल्या. 
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पेण विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, उपाध्यक्ष विलास चौलकर, ज्येष्ठ कार्यकर्ते हरेश काळे, तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, सुधाकर पारंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, विभागीय कार्याध्यक्ष सचिन कळसकर, नागोठणे विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव राजेंद्र शिंदे, प्रकाशशेठ जैन, अनिलशेठ  काळे, सुधाकर जवके, बिपिन सोष्टे, सुनील लाड, मनोज टके, अतुल काळे, चेतन टके, प्रथमेश काळे, सखाराम ताडकर, अंकुश ताडकर, रोशन पारंगे, केतन भोय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा अमिताताई शिंदे, महीला जिल्हा सरचिटणीस आशाताई शिर्के, रोहा तालुका उपाध्यक्षा रिचा धात्रक, तालुका उपाध्यक्षा निष्ठा विचारे, शहर अध्यक्षा सुजाता जवके, उपाध्यक्षा प्रतिभा तेरडे, नागोठणे ग्रामपंचायत सदस्या पूनम काळे, आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट, विजय पारंगे, घन:श्याम ताडकर, तात्या पोत्रिक, आरोग्य सहाय्यिका फुलावती पवार, आरोग्य सहाय्यक राजेंद्र पवार, भारत मारकड, आरोग्य सेवक वंदन तांबोळी, जगदीश मोकल, उत्तम जाधव आदींसह सर्व आरोग्य कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण यावेळी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!