नोकरीमहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
को. ए. सो.आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात सुदर्शन केमिकल कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट
प्रधान महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांना सुदर्शन कंपनीत मिळाली नोकरी

को. ए. सो.आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात सुदर्शन केमिकल कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट
प्रधान महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांना सुदर्शन कंपनीत मिळाली नोकरी
महेश पवार
नागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात धाटाव एमआयडीसी येथील सुदर्शन केमिकल लि. कंपनी, रोहा तर्फे फ्रेशर पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट चे आयोजन करण्यात आले होते. या प्लेसमेंट साठी पदवी व पदव्युत्तर मिळून २७ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम लेखी परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेत २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील गुणवत्ता धारक दहा विद्यार्थ्यांची मुलाखत घेण्यात आली व या मधील सहा सर्वोत्तम विद्यार्थ्यांना थेट नोकरी देण्यात आली आहे. तसेच दोन विद्यार्थ्यांना वेटिंग वर ठेवण्यात आले.

या प्लेसमेंट च्या निमित्ताने सुदर्शन कंपनीचे अधिकारी दिनकर पाटील व राजेंद्र शिंदे यांनी कंपनीची उद्दिष्टे व इतर माहिती विस्तृतपणे विद्यार्थ्यांना दिली. रोहा एमआयडीसीला सगळ्यात जास्त कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयातून मिळत असून त्याबद्दल महाविद्यालयाप्रती समाधान व्यक्त केले.या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी सुदर्शन केमिकल च्या टीमचे स्वागत केले. तसेच या प्लेसमेंट चा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा मिळावा अशी अशा व्यक्त केले व टीमचे धन्यवाद व्यक्त केले.
या प्रसंगी सुदर्शन कंपनीचे एच. आर. मॅनेजर तेजस करकुटे, माजी प्राचार्य डॉ. संदेश गुरव, रसायनशास्त्र विभाग समन्वय डॉ. श्रीकृष्ण तुपारे उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय प्लेसमेंट सेल प्रमुख डॉ. विलास जाधवर सह रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ. मनोहर शिरसाठ, प्रा.सौ चैत्राली पाटील प्रा. सौ तृप्ती बोरकर प्रा. प्राची दांडेकर तसेच प्रा. डॉ. विजय चव्हाण, डॉ. विकास शिंदे, प्रा.हेमंत जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. हा स्तुत्य उपक्रम राबविल्या बद्दल को.ए.सो.चे अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ पाटील, सेक्रेटरी ॲड. सौ.पल्लवी सिद्धार्थ पाटील यांनी सर्व टीमचे अभिनंदन केले.