मृदंग, टाळ ,वाद्यांच्या गजरात दुमदुमली निडी नगरी
आषाढी एकादशी उत्साहात साजरी

मृदंग, टाळ ,वाद्यांच्या गजरात दुमदुमली ली निडी नगरी
आषाढी एकादशी उत्साहात साजरी
वर्षा सहस्त्रबुद्धे
निडी – नागोठणे :

रायगड जिल्हा परिषद शाळा निडी तर्फे नागोठणे शाळेच्या विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्ताने विठ्ठल- रखुमाई, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, चोखामेळा आदी संतांची वेशभूषा करून, वारकऱ्यांच्या संप्रदायासह संपूर्ण निड गावातून भजन, अभंग, ओव्या गात ठिकठिकाणी विद्यार्थिनी वारीचे प्रदर्शन केले आणि लोकांना समतेची समानतेची शिकवण देणाऱ्या संतांची माहिती सांगितली. याच संतांच्या कामगिरीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या कार्यात उपयोग करून घेतला व त्याच संतांच्या कामगिरीचा मोलाचा वाटा होता. सर्वधर्मसमभावाने राहणे प्राणीमात्रांवर दया करणे याचा संदेश दिला.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… असे सांगून झाडे लावा, झाडे जगवा. झाडे ही देशाची संपत्ती आहे. असे संदेश निडी शाळेतील मुलांनी सर्वांपर्यंत पोहोचवले. आपल्या संस्कृतीच्या जतनासोबतच पर्यावरण रक्षणाचा मुलांनी लोकांपर्यंत संदेश पोहोचविल. निडी गावातील या वारीच्या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ, ग्रामस्थ व सर्व पालक वर्ग कार्यक्रमास सहभागी झाले होते. सर्वांचे आभार मानून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




