महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
नागोठणे परीट धोबी समाज मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव
समाजबांधव राजेंद्र घाग यांचे सहकार्य

नागोठणे परीट धोबी समाज मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव
समाजबांधव राजेंद्र घाग यांचे सहकार्य
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील परीट धोबी समाज मंडळ, नागोठणे यांच्या तर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२५ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नागोठणे गावचे सुपुत्र व श्री साई भक्त असलेले ज्येष्ठ समाज नेते, वसई – विरार – पालघर परीट समाज जिल्हा संस्थेचे सल्लागार आणि ठाणे – मुंबई जिल्हा परीट समाज संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र हरिश्चंद्र घाग यांच्या सहकार्यातून संपन्न झालेल्या या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्य आणि खाऊ चे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा परीट समाज संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत (दादा) घाग, शांताराम घाग, रोहा तालुका कमिटी सदस्य पुरुषोत्तम घाग, सुभाष घाग, सुदाम घाग, दिनेश घाग, संतोष घाग, गणेश शंकर घाग, भास्कर घाग, सुनील घाग, नितिन घाग, संजय कदम, कल्पेश घाग आदी मान्यवरांसह समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उपस्थित मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. याशिवाय समाजातील ज्येष्ठ आजी श्रीमती निर्मला दत्तात्रेय घाग यांचाही वयोश्री सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर उपस्थित सर्व माता – भगिनी आणि समाजातील महिला वर्ग आणि विद्यार्थी मित्र – मैत्रिणीचे स्वागत करण्यात आले.
महिलांमध्ये प्रामुख्याने सौ. शांताबाई घाग, सौ. शालिनी घाग, सौ. मनिषा घाग, सौ. समिधा घाग, सौ. निकीता घाग, सौ. अर्चना घाग, सौ. प्राची घाग, सौ. वैशाली घाग, सौ. कल्याणी घाग, सौ.दीपिका घाग, सौ. नेहा घाग, सौ. कामिनी सुर्वे, सौ. दीपिका सुर्वे, श्रीमती शैला सुर्वे, सौ. सरिता कदम, श्रीमती कांचन घाग, सौ. कांचन घाग, सौ . प्रणिषा तळेकर, सौ. सुषमा भास्कर घाग, श्रीमती रंजना तेलंगे इत्यादी माता भगिनी व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते आणि मार्गदर्शक राजेंद्र घाग हे काही कारणास्तव कार्यक्रमास्व उपस्थित न राहिल्याने त्यांचा सत्कार सुदामजी घाग यांनी स्वीकारला. तरीही राजेंद्र घाग यांनी केलेले सहकार्य आणि योगदानाबद्दल त्यांचे आयोजकांनी आभार मानले. अशाच प्रकारे त्यांनी वेळोवेळी नागोठण्यामध्ये उपक्रम घेऊन समाजाला पुढे नेण्यात योगदान द्यावे अशी विनंती त्यांना समाजबांधवांनी केली. कार्यक्रमाचे सुत्र संचालन गणेश चंद्रकांत घाग यांनी केले. उपस्थित समाज बांधवांना व भगिनींना आणि विद्यार्थ्यांना चंद्रकांत घाग, सुदाम घाग आणि दिनेश घाग यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सुदाम घाग यांनी सर्वांचे आभार मानले. नितीन घाग यांनी जागा उपलब्ध करुन दिल्या बद्दल त्यांचेही आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी मेहनत घेतली.




