महाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक

नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचा शुक्रवारी पळस येथे आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा

जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांची  उपस्थिती 

नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशनचा शुक्रवारी पळस येथे आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा
जिल्हा पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांची  उपस्थिती 
महेश पवार 
नागोठणे : सामाजिक बांधिलकी जपणारी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची संघटना असलेल्या रायगड प्रेस क्लब कडून जिल्ह्यातील शेतीनिष्ठ व प्रगत शेतकऱ्यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या
नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशन तर्फ शुक्रवार दि. १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नागोठण्याजवळील पळस येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवरामभाऊ शिंदे यांच्या प्रांगणात नागोठणे विभागातील बाळसई येथील प्रगत शेतकरी मधुकर ठमके व शेतपळस येथील महादेव डाकी यांना आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
आपला भारत देश हा शेतीप्रधान देश असून सध्याच्या काळात येणाऱ्या विविध अडचणींमुळे शेती करणे फार कठीण होऊन बसले आहे. या परिस्थितीत सुद्धा काही शेतकरी कष्ट घेऊन शेती करून आपली उपजीविका करीत आहेत. शेतकरी जगला तर आपण जगू या भावनेतून शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून अनेक वर्ष जिल्ह्यातील शेतीनिष्ठ प्रगत शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्या शेतावर जाऊन करण्यात येत असतो. त्या अनुषंगाने नागोठणे विभाग पत्रकार असोसिएशन तर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाला रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याची माहिती नागोठणे पत्रकार असोसिएशनचे सचिव अनिल पवार यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे, रोहा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शुभदा पाटील, नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, रोहा तालुका कृषी अधिकारी महादेव करे, रोहा पं. स. कृषी अधिकारी रणजित लवटे, रजिपचे माजी सदस्य नरेंद्रशेठ जैन, दिशा कमिटी रायगडचे सदस्य शिवरामभाऊ शिंदे, नागोठणे विभाग साहकारी भातगिरणी सभापती सदानंद गायकर, रोहा पं. से. माजी सदस्य डॉ. राजेंद्र धात्रक, नागोठणे सरपंच सुप्रिया महाडिक, पळस सरपंच सुप्रिया डाकी, नागोठण्याचे माजी सरपंच  सरपंच माजी सरपंच विलास चौलकर, माजी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, पळस उपसरपंच चंद्रकांत भालेकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल डाकी, पळसचे माजी सरपंच हिराजी शिंदे, माजी सरपंच मारुती शिर्के आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शामकांत नेरपगार व अध्यक्ष ऍड. महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव अनिल पवार, खजिनदार किशोर कदम,  सहसचिव राजेंद्र जोशी,  सदस्य विनोद भोईर, दिनेश ठमके, सुनिल कोकळे, चेतन टके, सचिन नेरपगार, राजेश पिंपळे, मंजुळा म्हात्रे, वर्षा सहस्त्रबुद्धे आदी विशेष मेहनत घेत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!