महाराष्ट्र ग्रामीणराजकारणवाढदिवस
पळस ग्रामपंचायतीकडून विविध उपक्रमांनी खा. सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा
खा. सुनील तटकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना

पळस ग्रामपंचायतीकडून विविध उपक्रमांनी खा. सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा
श्री पळसाई मातेच्या मंदिर परिसरात वृक्षारोपण करून खा. सुनील तटकरे यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना
२४ घरकुल लाभार्थींना वाळू पासचे वाटप
महेश पवार
नागोठणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण सुधागड विधानसभा मतदार संघाचे कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आलेल्या पळस ग्रामपंचायती मधील प्रमुख मार्गदर्शक शिवरामभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पळस ग्रामपंचायतीकडून खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पळस ग्रामपंचायत हद्दीतील सात वारकऱ्यांचा सन्मान, २४ घरकुल लाभार्थ्यांना वाळू पासचे वाटप, वृक्षारोपण, राजिप पळस प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असे विविध कौतुकास्पद व समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. तसेच पळस गावची ग्रामदेवता व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या श्री पळसाई मातेच्या मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करून खा. सुनील तटकरे यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे नेते शिवरामभाऊ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून श्री पळसाई मातेच्या चरणी प्रार्थना करण्यात आली.

या संपूर्ण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवरामभाऊ शिंदे, पळस ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया डाकी, उपसरपंच चंद्रकांत भालेकर, माजी सरपंच हिराजी शिंदे, मारुती शिर्के, शशिकांत शिर्के, रामभाऊ जोशी, पळसचे ग्राम महसूल अधिकारी सुधीर कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य सतीश डाकी, किसन बोरकर, पप्पू वाघमारे, निष्ठा विचारे, परीक्षा घासे, सुरेखा नाईक, उषा साळुंखे, ग्रामसेविका कांचन राऊत, हिराजी शेलार, नरेश भालेकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पळस ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात पळस ग्रामपंचायत हद्दीतील वारकरी संप्रदायाचे ह. भ. प. हिरामण नागोठकर, ह. भ. प. हिराजी शिंदे, ह. भ. प. सुनील सुतार, ह. भ. प. ज्ञानेश्वर शिर्के, ह. भ. प. संजय शिंदे,
ह. भ. प. राजेश शिर्के, ह. भ. प. पप्पू वाघमारे, आदींचा सत्कार वारकऱ्यांची सफेद वस्त्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याशिवाय पळस ग्रामपंचायत अंतर्गत मंजूर झालेल्या २४ घरकुल लाभार्थ्यांना चोळे व जांभूळटेप वाळू डेपोचे
प्रत्येकी ५ ब्रास वाळू पासचे वाटपही यावेळी करण्यात आले. याशिवाय श्री. पळसाई माता मंदिर परिसरात व पीएनपी सोसायटीच्या शेतपळस माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण, राजिप पळस प्राथमिक शाळेतील मुलांना खाऊ वाटप असे विविध उपक्रम खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पळस ग्रामपंचायतीकडून राबविण्यात आले. यावेळी शिवरामभाऊ शिंदे आणि पळस ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच निष्ठा विचारे यांनी आपल्या मनोगतातून खा. सुनील तटकरे यांच्या कार्याची माहिती देऊन त्यांना वाढदिवसासाठी आणि भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.





