रायगड जिल्हा परिषद शाळा निडी तर्फे नागोठणे येथे वृक्षारोपण
झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

रायगड जिल्हा परिषद शाळा निडी तर्फे नागोठणे येथे वृक्षारोपण
झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे

वर्षा सहस्त्रबुद्धे
निडी – नागोठणे : रायगड जिल्हा परिषद शाळा निडी तर्फे नागोठणे येथे सरखेल कान्होजी आंग्रे पुण्यतिथीच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. शाळा परिसर क्षेत्रात कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य निखिल बाळाराम मढवी, कोंडगाव ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच व विद्यमान सदस्या प्रणाली मढवी, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. तेजल मढवी, उपाध्यक्ष रोशन मढवी, अशा सेविका सौ. चित्रा मढवी, जयेश भोय, कैलास माढवी, माता पालक संघ, शिक्षक पालक संघ,

पालक वर्ग सर्वांनी शाळा परिसरात वृक्षारोपण केले . इको फ्रेंडली क्लब अंतर्गत शाळेतील ३७ मुलांनी “एक पेड माॅ के नाम” यानुसार आपल्या आईचे नावे वृक्षारोपण केले. शाळेतील १०० टक्के मुलांनी वृक्षारोपण केल्याबद्दल सरपंचानी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. झाडांची जोपासना करणे, पर्यावरणाचे रक्षण करणे, प्लास्टिक मुक्त गाव करणे, ईको फ्रेंडली क्लब मार्फत पर्यावरणाचे रक्षण हेच आपली कर्तव्य असे सरपंचांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी राजिप निडी शाळेचे मुख्याध्यापक रुपेश पाटील यांनी सर्व उपस्थितांचे शब्दसुमनाने आभार मानल्या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




