आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी भाऊ आमडोसकर यांचा सत्कार
आरोग्य विभागात केली प्रदीर्ग seva

सेवानिवृत्त आरोग्य कर्मचारी भाऊ आमडोसकर यांचा गवळ आळी ग्रामस्थांतर्फे सत्कार
आरोग्य विभागात केली प्रदीर्ग सेवा
नागोठणे : राजिप आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, नागोठणे येथून आपली प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले आरोग्य कर्मचारी तसेच नागोठणे के. एम. जी. विभागातील ग्रामस्थ, आणि गवळ आळी ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष राहिलेले एक आदर्श व्यक्तिमत्व भाऊ मोरू आमडोसकर आणि त्यांच्या सौभाग्यवती भावना आमडोसकर यांचा नुकताच गवळ आळी येथील राधाकृष्ण व साईबाबा मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विलास चौलकर, सचिव सुदाम घाग, खजिनदार गणेश घाग, मधुकर चौलकर, दिनेश घाग, रविंद्र वाजे, सखाराम ताडकर, संतोष घाग, विकास वादळ, संतोष पाटील, प्रभाकर पाटील, जगदीश चौलकर, सुभाष कटले, प्रणव वादळ, नामदेव पाटील, मनोज पाटील, शरद जोगत, संजय चौलकर, सचिन चौलकर, दत्तात्रय उतेकर, दत्तात्रय खरपुडे तसेच विद्यार्थी आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



