महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेने घेतली शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेने घेतली शिक्षणाधिकाऱ्यांची भेट
महत्वाच्या प्रश्नांवर केली सकारात्मक चर्चा
महेश पवार
नागोठणे : सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संघ, रायगड यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवार दिनांक १० जुलै रोजी रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती ललिता दहितुले यांची भेट घेतली. अलिबाग येथील कार्यालयात संघटनेच्या वतीने ललिता दहीतुले यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
संघटनेच्या प्रलंबित प्रश्नांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर या निवेदनातील रायगड जिल्हा परिषदेकडून ५२ सेवापुस्तके गहाळ झाली आहेत, तरी दुय्यम सेवा पुस्तकांना मान्यता मिळावी, निवड श्रेणीचा प्रश्न सोडविण्यासाठी जे १९६७ पर्यंत खात्यात लागलेले शिक्षक व १९६७ पर्यंत ट्रेंड झालेल्या शिक्षकांना दिनांक १३/५/२०१४ रोजी मान्यता मिळाली त्यांचा लाभ सुद्धा मिळाला परंतु काही शिक्षक लाभपासून वंचित आहेत. तसेच १९६७ पूर्वी खात्यात लागले पण १९६८ मध्ये ट्रेंड झाले आहेत त्यांना सुद्धा निवडश्रेणी मिळाली पाहिजे, उपदान रकमेतून संगणक वसुलीची रोखून ठेवलेली रक्कम त्वरित मिळावी, तसेच शिक्षकांस पेन्शन विक्रीस १५ वर्षे पुर्ण होताच त्याची वसुली थांबविण्यात यावी आदी महत्वाच्या प्रश्नांवर यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली.
हे सर्व प्रश्न गांभीर्याने समजून घेऊन शिक्षणाधिकारी
ललिता दहीतुले यांनी शिक्षण खात्याच्या
संबंधित क्लार्क यांना बोलावले होते. निवड श्रेणितील त्रुटी दूर करण्यासाठी अभ्यासू शिक्षकांना बोलावून घेणे. दुय्यम सेवापुस्तकांना ताबडतोब मान्यता देणे. थकीत शिक्षकांची बिले मंजूर करणे या कमी शिक्षणाधिकारी यांनी सहकार्यातून प्रश्न सोडविण्याचे अभिवचन यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी रायगड जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघ अध्यक्ष तुकाराम खांडेकर, सल्लागार वसंत शिंदे, मार्गदर्शक दामोदर कडू, कार्याध्यक्ष दीनानाथ जाधव, रोहा तालुका अध्यक्ष गजानन गुरव, माणगाव अध्यक्ष मारुती कासार, उरण अंकुश पाटील उपाध्यक्ष भाई सोनकर बि.व्ही. पवार एन. एस. पाटील, नामदेव म्हात्रे, बाळकृष्ण पवार, सुदाम मेने, सुनील फाले, सुरेश पालकर, मुणगे जनाब, भालचंद्र गोरेगावकर, खाडे गुरुजी, मुकुंद गंभे अन्य सेवानिवृत्त शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. वसंत शिंदे यांनी आभार मानल्यानंतर या महत्वपूर्ण बैठकीची सांगता झाली.




