महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

शिवसेना पिगोंडे शाखेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

शिवसेना पिगोंडे शाखेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप 

महेश पवार 
नागोठणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शाखा पिगोंडे, आंबेघर, वेलशेत तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रायगड जिल्हा परिषद शाळा पिगोंडे येथे ११ जुलै, रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झालेल्या कार्यक्रमात १ ली ते ७ वी या वर्गातील सर्व मुलांना वह्या , पेन, रजिस्टर या शैक्षणिक साहित्याचे  तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. याशिवाय इयत्ता दहावीमध्ये पहिल्या ३ क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच २३ व्या वर्षी चार्टर्ड अकाऊंट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कुमार ओमकार भालचंद्र शिर्के या विद्यार्थ्याचा सत्कारही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे हे ३८ वे वर्ष होते. शिवसेनेच्या पिगोंडे शाखेचा हा उपक्रम यापुढेही असाच सुरू राहण्यासाठी शिवसेना नेते किशोरभाई जैन व सपोनि सचिन कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला शिवसेना उबाठा नेते किशोरभाई जैन, नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी,  शिवसेना जिल्हा युवती अधिकारी धनवंती दाभाडे, विभाग प्रमुख ज्ञानेश्वर शिर्के, उपविभाग प्रमुख बळीराम बडे, पिगोंडे शाखा प्रमुख गंगाराम मिणमिने, 
प्रकल्पग्रस्त उपाध्यक्ष कु .रूपा भोईर, वेलशेत उप शाखा सुभाष मढवी, पुंडलिक ताडकर, गोरख पारंगे,  लक्ष्मण घासे ,रंजना माळी, भालचंद्र शिर्के, ओमकार शिर्के, राजू बडे, देवजी माळी, विश्वास बडे,  दीप्ती मढवी आदींसह सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी तसेच  आंबेघर, वेलशेत गावातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!