शिवसेना रोहा तालुका महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
अर्चना जैन यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना रोहा तालुका महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न
अर्चना जैन यांचा शिवसेनेत प्रवेश
वर्षा सहस्त्रबुद्धे
निडी–नागोठणे : शिवसेना रायगड जिल्हा महिला आघाडी संपर्क प्रमुख संजीवनी नाईक यांच्या उपस्थितीमध्ये आणि शिवसेना रोहा तालुकाप्रमुख ॲड. मनोज कुमार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख अमृताताई धनावडे तसेच शिवसेना महिला आघाडी संपर्कप्रमुख योगिताताई शिर्के यांच्या उपस्थितीमध्ये रविवार दिनांक २७ जुलै रोजी शिवसेना रोहा तालुका महिला पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीत सारसोली येथील अर्चना महेंद्र जैन यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी चणेरा महिला विभाग प्रमुख नीलमताई बेणारे, उप तालुका प्रमुख मेघाताई सावंत, उपतालुकाप्रमुख वर्षाताई सहस्त्रबुद्धे, वैभवीताई भगत, ग्रामपंचायत सदस्य रोठ खुर्द, चणेरा ग्रामपंचायत सदस्य पूजाताई विचारे, सानिका करंजे, अस्मिता मानदाडकर व इतर महिला आघाडीच्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.