महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
शिवसेनेच्या रोहा तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
शिवसेनेच्या रोहा तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी दिल्या भगव्या शुभेच्छा

शिवसेनेच्या रोहा तालुक्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी दिल्या भगव्या शुभेच्छा !

वर्षा सहस्त्रबुद्धे
निडी – नागोठणे : शिवसेना रोहा तालुकाप्रमुख ॲड मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना रोहा तालुक्याची आढावा सभा शनिवार दिनांक १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये योगिताताई शिर्के यांची रोहा तालुका महिला संपर्क प्रमुख तसेच ॲड. सार्थक जाधव यांची ग्राहक संरक्षण रोहा शहर प्रमुख पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दुर्गेश घोसाळकर सोनारी शिवसेना शाखाप्रमुख, सिद्धात मोरे सोशल मीडिया रोहा शहर प्रमुख, केतन भारत देशमुख ग्राहक संरक्षण कक्ष उपशहर प्रमुख,

अवधेश प्रजापती सोशल मीडिया उपतालुकाप्रमुख, जितेंद्र पाखर युवा सेना चणेरा विभाग प्रमुख, मयूर जाधव युवासेना उपशहरप्रमुख,
केवल शेडगे युवासेना उप विभागप्रमुख, अरबाज खान युवासेना उपविभागप्रमुख तसेच संदीप वाजे यांची युवा सेना नागोठणे शहर प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना तालुका प्रमुख ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी भगव्या शुभेच्छा दिल्या आहेत.