महाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिकसांस्कृतिक
आनंदीबाई प्रधान महाविद्यालय भारत पाकिस्तान फाळणी दिन व हर घर तिरंगा अभियान कार्यक्रम

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात भारत पाकिस्तान फाळणी दिन व हर घर तिरंगा अभियान कार्यक्रम
महेश पवार
नागोठणे : भारतीय स्वातंत्र्य पूर्वसंध्येला कोकण एज्युकेशन सोसायटीच्या येथील बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना भारत पाकिस्तान विभाजन विभीषिका व हर घर तिरंगा ध्वज विषयक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना ध्वज वाटप करण्यात आले. शिवाय ऑनलाईन भारत-पाकिस्तान विभाजन विभीषिका दिनानिमित्त राष्ट्राला जनजागृती व्हावी व भारतीयांच्या दु:खाचे स्मरण व्हावे आणि विस्थापित लोकांचे दु:ख तरूण पिढीला माहित व्हावे हा या मागे उद्देश होता. हे संपूर्ण चित्रण पथ नाट्याच्या स्वरूपात दाखविण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांना तंबाखू व धुम्रपान अशा मादक पदार्थ सेवन न करण्याची शपथ देण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे व डॉ. मनोहर शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले. याच दिवशी स्वंयसेवकांनी तयार केलेल्या राष्ट्रीय एकात्मता विषयावरील पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी प्राचार्य डॉ. संदेश गुरव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी प्रा. डॉ. विलास जाधवर, प्रा. डॉ. सौ. स्मिता चौधरी, प्रा. सौ. प्रतिक्षा म्हात्रे, प्रा. प्राची दांडेकर सह कु. सुमीत घासे, कु. साहिल घरत, कु. कुणाल खांडेकर कु. रसिका कदम, कु. पायल कु. सुष्मिता आदींनी मेहनत घेतली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व वर्गांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.




