अपघातनिधनमहाराष्ट्र ग्रामीण

अंबा नदीत वाहून गेलेल्या नागोठणे मोहल्ल्यातील अनवर शेखचा मृतदेह सापडला 

मृतदेह पाहताच नातेवाईकांकडून आक्रोश 

अंबा नदीत वाहून गेलेल्या नागोठणे मोहल्ल्यातील अनवर शेखचा मृतदेह सापडला 

मृतदेह पाहताच नातेवाईकांकडून आक्रोश 
महेश पवार 
नागोठणे : येथील अंबा नदीत वाहून गेलेल्या नागोठणे मोहल्ल्यातील ५७ वर्षीय अनवर शेख यांचा मृतदेह तब्बल ५० तासानंतर सापडला आहे. अनवर यांचा मृतदेह अंबा नदीच्या खाडीत सांबरी गावच्या पकटी जवळ असल्याची माहिती नागोठण्याच्या निसर्ग वन्यजीव संरक्षण संस्था रायगड (NVSSR) यांच्या नागोठणे टीमला मिळाली होती. त्यानंतर या टीमने सांबरी पकटी येथे जाऊन अनवर यांचा मृतदेह छोट्या होडीत टाकून नागोठण्यात आणला. अनवर यांचा  मृतदेह पाहताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
शनिवार दिनांक २३ जुलै रोजी वरवठणे बाजूकडे कामानिमित्त गेलेले अनवर शेख हे नागोठण्यातील जुन्या ऐतिहासिक पुलावरून नागोठण्याला येत असताना ते पुलाच्या मध्यभागी आले असता पुलावरून पाय घसरून पडल्याने अनवर हे अंबा नदीच्या पात्रात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास  वाहून गेले होते. अंबा नदीच्या पात्रात अनवर शेख यांची शोध मोहीम सह्याद्री वन्यजीव संरक्षण संस्थेच्या (SVRSS) टीम कडून शनिवारी संध्याकाळपर्यंत राबविण्यात आली होती मात्र अनवर शेख सापडले नव्हते.
दरम्यान निसर्ग वन्यजीव संवर्धन संस्था रायगड (NVRSS) यांच्या नागोठणे टीम कडू अनवर शेख यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून नागोठण्यात आणण्यासाठी गेलेल्या या टीम मध्ये एन व्ही आर एस एस चे नागोठणे अध्यक्ष प्रथमेश कोळी, सदस्य  प्रणाल शिर्के, वसंत डोलकर, नवनीत मोकल, साहिल राणे, सनिस मिणमिणे, रोहित पाटील, स्वागत पारंगे, विनय पारंगे, कल्पेश बडे, नीरज बडे, अखिल शेलार यांचा समावेश होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!