निधनमहाराष्ट्र ग्रामीण
अंजली जोगत यांचे अल्पशा आजाराने निधन

अंजली जोगत यांचे अल्पशा आजाराने निधन
नागोठणे : नागोठण्यातील गवळ आळी भागातील रहिवासी व गवळ आळी मधील महिला मंडळाच्या प्रमुख आधारस्तंभ असलेल्या अंजली उर्फ बेबीआई गणपत जोगत (वय ७२) यांचे यांचे शुक्रवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. नागोठण्यातील के.एम.जी.विभागातील गवळी आळीतील ग्रामस्थ आणि प्रसाद डेकोरेटर्सचे मालक प्रसाद जोगत व
शेखर जोगत यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन विवाहित मुलगे प्रसाद व शेखर, दोन विवाहित मुली दीपा महागावकर व कविता दिवेकर, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे.
दिवंगत अंजली जोगत यांच्या पार्थिवावर गवळ आळीतील वैंकुठधाम स्मशानभूमीत शुक्रवारीच सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जोगत यांचे नातेवाईक, सगेसोयरे, मित्रपरिवार, नागोठणे शहर व विभागातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, समाज बांधव तसेच गवळ आळी तसेच के.एम.जी. विभागातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत अंजली जोगत यांचे दशक्रिया विधी रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी कुंभार आळीतील तळ्यावरील दशक्रिया घाटावर तर उत्तरकार्य सोमवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी गवळ आळीतील त्यांच्या निवासस्थानी होणार असल्याचे जोगत कुटुंबियांकडून सांगण्यात आले.




