बाळसई गावचा सुपुत्र सुजल धाडवे याची भारतीय नौदलात निवड

बाळसई गावचा सुपुत्र सुजल धाडवे याची भारतीय नौदलात निवड
दिनेश ठमके
सुकेळी : रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या बाळसई गावातील तरुण सुजल महादेव धाडवे याची नुकतीच भारतीय नौदलात निवड झाली. त्याच्या या निवडीमुळे बाळसई गावाचे नाव उज्ज्वल झाले असुन बाळसई गावासह संपूर्ण रोहा तालुक्यातुन सुजल याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अतिशय गरीब परिस्थितीतुन तसेच आई- वडीलांच्या मेहनीतीच्या जोरावर सुजल याने भारतीय नौदलात जाण्याचे स्वप्न साकार केले आहे. भारतीय नौदलाच्या सन २०२५ च्या झालेल्या परिक्षेत भारतीय नौदलात त्याची निवड झाली. महत्वाचे म्हणजे त्याने कोणत्याही अॅकॅडमी मध्ये प्रवेश न घेता स्वतःच्या हिंमतीवर त्याने उज्वल यश संपादित केले. याआधिदेखिल सुजल याने भारतीय नौदलात भरती होण्यासाठी १४ वेळा परीक्षा देत प्रयत्न केले. पंरतु असफतेमुळे निराश न होता तसेच कोणत्याही प्रकारचे नैराश्य न बाळगता पुन्हा एकदा यावेळी १५ व्या वेळा परीक्षा देत त्यांनी उज्वल यश संपादन करीत उत्तुंग अशी भरारी घेत भारतीय नौदलामध्ये भरती होण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण केले.
सुजल याच्या यशाबद्दल ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व तरुण मंडळ बाळसई यांच्यासह संपूर्ण रोहा तालुक्यासह नागोठणे परिसरातुन सुजल याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




