महाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेषराजकारण
भाजपा महिला मोर्चा जिल्हा चिटणीसपदी पल्लवी मढवी यांची निवड
पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी

भाजपा महिला मोर्चा जिल्हा चिटणीसपदी पल्लवी मढवी यांची निवड
पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देणार : पल्लवी मढवी
महेश पवार
नागोठणे : भाजपच्या दक्षिण रायगड महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष पदाची धुरा हाती घेतल्यापासून डॉ. चित्राताई आस्वाद पाटील यांनी अनेक नवीन आणि होतकरू महिलांना संधी दिली आहे. यातच नागोठण्याजवळील निडी येथील पक्षाच्या होतकरू कार्यकर्ती आणि कोंडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य तसेच खा. धैर्यशीलदादा पाटील यांचे खंदे समर्थक निखिल मढवी यांच्या पत्नी सौ. पल्लवी निखिल मढवी यांना खा. धैर्यशीलदादा पाटील व भाजप महाराष्ट्र राज्य परिषद सदस्या नीलिमाताई पाटील यांच्या शिफारशीनुसार भाजपाच्या दक्षिण रायगड महिला मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र डॉ. चित्राताई पाटील यांच्याकडून पल्लवी मढवी यांना पेण येथील कार्यक्रमात नुकतेच देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्षा वर्षाताई भोसले व भाजपा नेते पंडितशेठ पाटील यांच्यासह भाजपाचे अनेक नेतेगण व कार्यकर्ते उपस्थित होते.
या पत्रात म्हटले आहे की, लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वात भारताची मान जगात उंचावत आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व आदरणीय महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची प्रगती होत आहे. समाजातील तळागाळापर्यंत सर्व घटकांना या प्रगतीचे भागीदार बनविण्याचा आपला उद्देश आहे. त्यासाठी अखंड कार्य करावे अशी माझी आपणास आग्रहाची विनंती आहे.
भारतीय जनता पार्टीला अभिप्रेत असलेले संघटन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांना एकत्र करून पक्षाची ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवितांना सर्व महिलांना व सदस्यांना सोबत घेऊन पक्ष मजबुतीसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल असा मला विश्वास आहे. आपल्यावर टाकण्यात आलेल्या जबाबदारी बद्दल आपले पुनच्छ अभिनंदन असेही या पत्रात चित्रताई पाटील यांनी म्हटले आहे. पल्लवी मढवी यांच्या नियुक्तीने निडी गावात तसेच नागोठणे परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. दरम्यान आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग तालुक्यासह जिल्ह्यातील भाजपा महिला मोर्चा आघाडी व पक्ष संघटना बळकट करण्यासाठी करणार असल्याचे तसेच राज्य व केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण योजना घरोघरी पोहोचविणर असल्याचे पल्लवी मढवी यांनी सांगितले.