Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिकसांस्कृतिकसाहित्यिक
भटके विमुक्त दिनानिमित डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन

भटके विमुक्त दिनानिमित डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन
महेश पवार
नागोठणे : नागसेन एज्युकेशन सोसायटी अँड बुद्धसेन कल्चरल ट्रस्ट मुंबई द्वारा संचलित, डॉ. नेल्सन मंडेला आश्रम शाळेच्या वतीने नागोठणे येथील शाळेच्या प्रांगणात रविवार दि.३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता “भटके विमुक्त दिनाचे आयोजन करण्यात आले आहे” या निमित्ताने भटक्या विमुक्त संस्कृतीचे जीवन मूल्य, संस्कृती आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे संयोजन समितीकडून सांगण्यात आले. या संस्थेच्या मुंबई येथील मुख्य ठिकाणी कोकण विभागीय कार्यक्रम साजरा करण्यात येणार असून गायन, वाद्य संगीत व्याख्यान विद्यार्थी मेळावा या आणि अन्य लोककल्याणकारी योजनांची माहिती व या संवर्गातील सन्माननीय व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे.या निमित्ताने मुंबई महानगर प्रदेशातील विमुक्त भटक्या जाती जमातीचे वर्तमानकालीन व्यवसाय आणि सांस्कृतिक जीवनाचे छायाचित्र संकलन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी Email- gdongargaonkar@gmail. com तसेच whats app no. ९०४९८८२०३६ या वर छायाचित्र ३० ऑगस्ट २०२५ पूर्वी पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे.




