महाराष्ट्र ग्रामीणवाहतूक
होंडा कंपनीच्या दुचाकी शोरूमचे नागोठण्यात उद्घाटन

होंडा कंपनीच्या दुचाकी शोरूमचे नागोठण्यात उद्घाटन
नागोठणे : सिमरन मोटर्स ग्रुपच्या सिमरन व्हील्स प्रा. लि. यांच्या दशमेश होंडा या दुचाकी शोरूमचे उद्घाटन नागोठणे आय टी आय कॉलेज समोरील इमारतीत नुकतेच करण्यात आले. पेण, पनवेल, अलिबाग, पोयनाड, माणगाव, रोहा आदी ठिकाणानंतर आता नागोठण्यात होंडा कंपनीचे शोरुम आणि सर्व्हिस सेंटर सुरू झाल्याने होंडा कंपनीच्या दुचाकी असणाऱ्या दुचाकी मालकांची सर्व्हिसिंग साठी इतरत्र जाण्याची ओढाताण आता संपणार आहे.

दशमेश होंडा कंपनीच्या नागोठण्यातील या शोरूमचे उद्घाटन प्रसंगी सिमरन ग्रुपचे एम.डी. तरण कोहली, अरविंदर कौर कोहली, सनी जेसेम सर, अभिनव सर, नागोठणे ग्रामपंचायतीच्या सदस्या शबाना मुल्ला, पत्रकार व ऍडव्होकेट महेश पवार, सिमरन एरिना चिकणी शोरुम मधील ब्रँच हेड संदेश म्हात्रे, सर्व्हिस मॅनेजर तैफ सय्यद, निलेश पिंपळे आदींसह अनेक मान्यवर व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होता.