धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
के एम जी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी गणेश घाग यांची निवड

के एम जी विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर
अध्यक्षपदी गणेश घाग यांची निवड
महेश पवार
नागोठणे : येथील प्रसिद्ध आणि नवसाला पावणाऱ्या के एम जी चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सन – २०२५ ची नवीन कार्यकारिणी मंडळ जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळाचे हे ६६ वे वर्ष असून मंडळाच्या अध्यक्षपदी यावर्षी गणेश चंद्रकांत घाग यांची निवड करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळाच्या उर्वरित कार्यकारिणीमध्ये मयुर वाघमारे – उपाध्यक्ष, प्रमोद नागोठणेकर – सचिव, प्रणय कडव – खजिनदार, संदीप वाजे – सह सचिव, प्रफुल्ल नागोठणेकर – सह खजिनदार यांची निवड करण्यात आली आहे.
नवीन कार्यकारिणीला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ मंडळी कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतील. यात प्रामुख्याने नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, माजी उपसरपंच सुनील लाड, सुदाम घाग, ग्रामपंचायत सदस्य संतोष नागोठणेकर, संतोष चितळकर, रोहिदास हातनोलकर यांचा समावेश करण्यात आला आहे. सार्वजनिक मंडळांमुळेच गावच ऐक्य टिकुन राहते. आपली परंपरा आपणच जोपासली पाहिजे असा सल्ला माजी सरपंच विलास चौलकर यांनी दिला. सुनील लाड आणि दिनेश घाग यांनी के एम जी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना ते आतापर्यंतची यशोगाथा सांगितली.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी झालेल्या बैठकीला कुंभार आळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विजय नागोठणेकर, मराठा आळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुनिल लाड, गवळ आळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष विलास चौलकर, नामदेव लाड, आनंद लाड, सुदाम घाग, नाथ भक्त दत्ताराम राजिवले, मंडळाचे माजी अध्यक्ष राकेश चितळकर तसेच सन – २०२४ आणि २०२५ ची नवनियुक्त कमिटी संतोष नागोठणेकर, रोहिदास हातनोलकर, संतोष घाग, अशोक भंडारी, अमित पवार, मंगेश लाड, प्रज्योत कडव, राजेंद्र गायकर, संदेश पोटे, रुपेश जगताप, स्वप्नील भोसले, दीपक खांडेकर ,
संकेत लाड, तुकाराम खांडेकर गुरुजी, नितीन राजिवले, विपुल हेंडे, प्रविण आमडोसकर,
सुजित पाटील, सनिल धुमाळ, प्रशांत महाडिक, कल्पेश घाग, उदय गायकर, सुमित जाधव, रोशन कडव आदी मान्यवर आणि तिन्ही आळीतील तरुण मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी विलास चौलकर, दिनेश घाग, सुनिल लाड, संतोष नागोठणेकर यांनी आपले मौलिक मार्गदर्शन केले. तसेच गणेशोत्सवात राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली.
अनेक संकटांवर मात करत मंडळाने ६५ वर्षे पुर्ण केली आणि आता मंडळ ६६ वे वर्ष साजरा करणार आहे.
गणेश घाग यांनी अध्यक्षीय भाषणात मागील वर्षी च्या कमिटीने राकेश चितळकर यांच्या अध्यक्षतेखाली सुंदर आणि नियोजनपूर्ण कार्यक्रम यशस्वी केले. या वर्षीही त्यांनी नवीन कार्यकारिणी ला सहकार्य करावे असे आवाहन केले. मंडळातील आजी माजी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळींनी आणि के एम जी विभागातील ग्रामस्थानी आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्हा नवनियुक्त कार्यकारिणीला द्यावे. तन मन आणि धन अर्पून सहकार्य करावे असे आवाहन केले. शेवटी आपल्या सर्वांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे काम करून येणारा गणेशोत्सव साजरा करू. नवीन कमिटी निश्चितच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेईल असे स्पष्ट केले. उपस्थिती ग्रामस्थांचे दिनेश घाग यांनी आभार मानले.