महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
खा. सुनील तटकरे यांचे वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व खुप मोठे असल्यानेच त्यांचा भारत भूषण पुरस्काराने सन्मान : शिवरामभाऊ शिंदे
नागोठणे शहर व विभागीय राष्ट्रवादीकडून खा. सुनील तटकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव

खा. सुनील तटकरे यांचे वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व खुप मोठे असल्यानेच त्यांचा भारत भूषण पुरस्काराने सन्मान : शिवरामभाऊ शिंदे
नागोठणे शहर व विभागीय राष्ट्रवादीकडून खा. सुनील तटकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव
महेश पवार
नागोठणे : खा. सुनील तटकरे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदापासून राज्यातील मंत्रिमंडळात अर्थ, ऊर्जा, अन्न व नागरी पुरवठा अशी अनेक महत्वाची खाती यशस्वीपणे सांभाळली आहेत. रायगडसह महाराष्ट्राच्या विकासात, प्रगतीत तटकरे साहेबांचे मोठे योगदान आहे. केंद्रातही त्यांनी रायगड – रत्नागिरीसह राज्याचे प्रतिनिधित्व करतांना मराठी भाषेचा मुद्दा यशस्वी केला. देशाचे गृहमंत्री तटकरे साहेबांच्या घरी येतात यावरून त्यांची ताकद सिद्ध होते. अशा आपल्या उमद्या नेतृत्वाची दखल घेत त्यांना दर्डा लोकमत समूहाने भारत भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. खा. तटकरे साहेबांचे वक्तृत्व, नेतृत्व व कर्तृत्व खुप मोठे असल्यानेच त्यांचा हा सन्मान करण्यात आल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते शिवरामभाऊ शिंदे यांनी नागोठण्यातील बैठकीत व्यक्त केले.

लंडन येथे ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमीक कन्व्हेन्शन’ च्या वतीने आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे यांना ‘भारत भूषण’ या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागोठण्यावर माझे विशेष प्रेम असून नागोठणे हे माझे कुटुंब आहे असे म्हणणाऱ्या खा. सुनील तटकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यासाठी राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन मंगळवारी (दि.१९) सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके, शिवरामभाऊ शिंदे, हरेश काळे, विलास चौलकर, डॉ. राजेंद्र धात्रक, विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, विभागीय सचिव राजेंद्र शिंदे, विभागीय युवक अध्यक्ष प्रमोद जांबेकर, बिपिन सोष्टे, मोरेश्वर तेलंगे, सखाराम ताडकर, किसन बोरकर, मनोज टके, रोशन पारंगे, चेतन टके, प्रमोद भोसले, शरद कामथे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विभागीय युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही अध्यक्ष प्रमोद जांबेकर यांनी खा. सुनील तटकरे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या दोन्ही ठरावांना उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात मंजुरी दिली.

या बैठकीचे प्रास्ताविक राजेंद्र शिंदे यांनी केले. यावेळी डॉ. राजेंद्र धात्रक, संतोषभाई कोळी यांनीही खा. सुनील तटकरे यांच्या विविध कार्याची माहिती देऊन मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले. या बैठकीचे आभार प्रदर्शन राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी केले.




