महाराष्ट्र ग्रामीणवाढदिवसशैक्षणिक
खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे शहर राष्ट्रवादीकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे शहर राष्ट्रवादीकडून विद्यार्थ्यांना वह्या वाटप
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद
महेश पवार
नागोठणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड – रत्नागिरीचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांचा ७० वा वाढदिवस नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सर्वच ठिकाणी विविध समजपयोगी उपक्रम राबवून साजरा साजरा केला. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नागोठणे शहरातील कार्यकर्त्यांकडून व राष्ट्रवादीच्या नागोठणे शहर महिला आघाडीच्या वतीने खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी (दि.१) राजिपच्या नागोठण्यातील कचेरी शाळा, कन्या शाळा, जोगेश्वरी नगर येथील प्राथमिक शाळा व मुरावाडी येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. वह्या वाटपानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलल्याचे दिसून आले.
नंतर उपस्थित कार्यकर्ते, विद्यार्थी व शिक्षक वर्गाने खासदार सुनील तटकरे यांना जनसेवेसाठी निरोगी व दीर्घायुष्य मिळावे यासाठी प्रार्थना केली.

या वह्यावटप कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, महिला आघाडी शहर अध्यक्षा सुजाता जवके, जिल्हा सरचिटणीस आशा शिर्के, महिला आघाडी जि. प. गण अध्यक्षा स्नेहल काळे, शहर उपाध्यक्षा प्रतिभा तेरडे, युवा नेते मनोज टके, सिद्धेश काळे, अलोक काळे, नितीन पत्की, घनश्याम ताडकर, निलेश म्हात्रे आदी कार्यकर्त्यांसह कचेरी शाळेच्या मुख्याध्यापिका समा शेळके, शिक्षिका ज्योती सैंदाणे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.