धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिकसाहित्यिक

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती नागोठण्यात उत्साहात साजरी 

लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांची जयंती नागोठण्यात उत्साहात साजरी 

महेश पवार 
नागोठणे : एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक असलेले आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या लेखनाने महत्वाची भूमिका बजावणारे तसेच ज्यांच्या कार्याची दखल घेऊन रशिया देशांत ज्यांचा पुतळा उभारण्यात आला असे थोर समाजसुधारक, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ.  अण्णा भाऊ साठे यांची १०५ वी जयंती येथील रामनगर भागातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मित्रमंडळाच्या वतीने नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील मुंबई गोवा महामार्गाच्या लगत असलेल्या रामनगर येथून सकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मित्रमंडळाच्या वतीने अण्णा भाऊ साठे यांची भव्य तसवीर घेऊन वाजत, गाजत व नाचत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मित्रमंडळाचे अध्यक्ष लखन माने, उपाध्यक्ष गणेश इचके, खजिनदार संदीप तांबे, सचिव साई माने, सल्लागार श्रीरंग बाभुळकर, सहदेव खंडारे आदींसह मित्रमंडळाचे सर्व सदस्य व समाज बांधव सहभागी झाले होते.
रामनगर मधून निघालेली ही मिरवणूक खडकआळी, ग्रामदेवता जोगेश्वरी माता मंदिर मार्गे नागोठणे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आली. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांनी मिरवणुकीचे स्वागत करून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या तसविरिला पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. त्यानंतर ही मिरवणूक दुपारी नागोठणे ग्रामपंचायतीच्या शिवगणेश सभागृहात आली.  त्यानंतर समाज प्रबोधनपर कार्यक्रम झाल्यानंतर या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य व रामनगर ग्रामस्थांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!