पूरमहाराष्ट्र ग्रामीण

नागोठणे अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी 

एसटी बस स्थानकासह मुख्य रस्त्यावर पाणी

नागोठणे अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी 

एसटी बस स्थानकासह मुख्य रस्त्यावर पाणी
अनिल पवार 
नागोठणे : बदलेले नक्षत्र त्यातून बेडूक वाहन त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार पावसाने जोरदार मुसळधार बसण्यास सुरुवात केली आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात पुरता धुमाकूळ घातला असतानाच सुधागड तालुका व रोहा,नागोठणे परिसराला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून दुथडी भरुन वाहणाऱ्या नागोठणे येथील अंबा नदीने शेवटच्या श्रावणी सोमवारी (दि.१८ ऑगस्ट) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. त्यानंतर सतत कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे काही वेळातच नदी काठावरील सखल भागातील शहरातील  एसटीचे बस स्थानक, स्थानिक टेम्पो स्टँड परिसरात, कोळीवाडा परिसर,विशाल मेडिकल शेजारील मरीआई देवी मंदिरासमोर तसेच नागोठणेहून पेणकडे जाण्यासाठी असलेल्या गावातील मुख्य रस्त्यावर पूराचे पाणी आले होते.
दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीला यावर्षी हा तिसऱ्यांदा पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीला आलेल्या पुराचे पाणी नदी काठावरील सखल भागात शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले. मिनी डोअर रिक्षा सेवा पूर आल्याने बंद करण्यात आली होती. त्यांनी एसटी मुंबई गोवा महामार्गावर आपल्या रिक्षा उभ्या ठेवल्या होत्या. बस स्थानकात पुराचे पाणी शिरल्याने तसेच वन विभागाच्या कार्यालयापुढे व हॉटेल लेक व्ह्यू समोर मुख्य रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने एसटी बसची वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. त्यामुळे यावेळी रोज स्थानकात येणाऱ्या एसटी बस शहराबाहेरील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील मुंबई गोवा महामार्गावर थांबविण्यात येत होत्या. याचबरोबर पूर आल्याने सखल भागातील लहान मोठ्या दुकानदारांची तारांबळ उडाली होती.यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून नदी काठावरील सखल भागातील दुकानदारांकडून आपला माल सुरक्षित स्थळी हलविण्यात येत होते. दरम्यान मुसळधार पावसामुळे अंबा नदीला आलेल्या पुरामुळे नागोठणे शहर व परिसरातील विद्यार्थ्यांची चांगलीच गैरसोय झाली होती. याचबरोबर नागोठणे परिसरातून दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना देखील या पुराचा फटका सहन करावा लागला.
सुरु असलेल्या धुंवाधार मुसळधार पावसामुळे अंबा नदीला आलेल्या पुरामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सरपंच सुप्रिया संजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे ग्रामपंचायत प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. तर अंबा नदीने दुपारी धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर शहरातील नागरिकांनी कुणीही नदीकिनारी,सखल भागात वा पुराच्या पाण्याच्या जवळपास जाऊ नये असे आवाहन नागोठण्याचे सरपंच सुप्रिया महाडिक यांच्याकडून करण्यात आले होते. याचबरोबर जेणेकरून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस पुराचे पाणी शिरलेल्या एसटी बस स्थानकासह सखल भागातील मुख्य मार्गावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!