धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक

नागोठण्याजवळील पाटणसई गावातील गोविंदा जपतोय परंपरा

रोहा पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर यांचा उत्स्फूर्त सहभाग

नागोठण्याजवळील पाटणसई गावातील गोविंदा जपतोय परंपरा

पाटणसईत व वाकण नाक्यावर पारंपारिक गोपाळकाला साजरा

रोहा पंचायत समितीचे माजी सभापती सदानंद गायकर यांचा उत्स्फूर्त सहभाग

सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ७ पर्यंत तोच उत्साह

महेश पवार

नागोठणे : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात शनिवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यामध्ये नागोठण्याजवळील पाटणसई गावातील गोविंदा पथकाने गेल्या सुमारे ८० वर्षांपासुन आजपर्यंत नागोठणे विभागासह रोहा तालुक्यात आपली परंपरा, नावलौकीक व आकर्षण आजही टिकवुन ठेवल्याचे यावर्षीच्या दहीहंडी उत्सवानिमित्त दिसून आले आहे. त्याबद्दल पाटणसई गोविंदा पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावर्षीच्या गोपाळकाल्या निमित्त पावसानेही दमदार हजेरी लावल्यामुळे गोविंदामध्येही उत्साह जाणवत होता.

पाटणसई गावचे सुपुत्र आणि रोहा पंचायत समितीचे माजी सभापती आणि नागोठणे विभाग सहकारी भात गिरणीचे विद्यमान सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय नेते सदानंद गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीही पाटणसई गावात तसेच वाकण नाक्यावर पारंपारीक पद्धतीने गोपाळकाला उत्साहात साजरा करण्यात आला. वाकण नाक्यावरील या दहीहंडी सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सदानंद गायकर, मधुकर ठमके, गंगाराम गायकर, हेमंत गायकर, माजी उपसरपंच पांडुरंग गायकर, तुकाराम राणे, उपसरपंच सुरेश गायकर, शंकर कोतवाल, तंटामुक्त अध्यक्ष मदन गायकर, विकास म्हात्रे, संतोष राणे, अनंत कोतवाल, प्रदिप मिनमीने, वामन राऊत, छबीलदास कोतवाल, सुधीर दाभाडे, भिमराव येवले, राजेंद्र जोशी, हनुमान जोशी, जनार्दन गायकर, दयानंद गायकर अशोक कोतवाल पांडुरंग मिणमिणे, शिवराम गायकर, काशिनाथ कोतवाल, प्रवीण दाभाडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पाटणसई येथिल गोविंदा पथकाला शिस्त, वळण व एकजुट लावण्याचे काम पूर्वी पाटणसईचे दिवगंत सरपंच देविदास गायकर व माजी सरपंच कै.रामभाऊ राणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. त्यानंतर १९९३ साली कै.देविदास गायकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर गोविंदाची जबाबदारी ही सदानंद गायकर यांच्यावर पडली आणि आजपर्यत दिवंगत जुन्या लोकांचा आदर्श समोर ठेवत पाटणसईचा गोविंदा हा संपुर्ण नागोठणे परिसरासह आजुबाजुच्या पंचक्रोशीत शिस्तप्रिय गोविंदा असे नाव कमावत आहे. आमचा गोविंदा पथक मोठ्या मोठ्या रकमांच्या बक्षिसांच्या दही हंडी फोडण्यासाठी कुठेही जात नाही मात्र आम्ही पाटणसई गावातील व वाकण नाक्यावरील मानाच्या व पारंपारिक दहीहंड्या फोडण्यात आनंद मानतो असे यावेळी सदानंद गायकर यांनी वाकण नाक्यावरील दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमात सांगितले.

पाटणसई येथिल गोविंदाची सुरूवात सकाळी ९ वाजता क्षेत्रपाल मंदिर येथुन होते. त्यानंतर प्रथमत: पाटणसई आदिवासी वाडीवरील मनाची हंडी फोडुन हा गोविंदा पाटणसई गावामध्ये येतो. अंत्यत शिस्तबद्धपणा असे या गोविंदाचे वैशिष्ट्य आहे. गौळण, भंडारी, महाडी, शाभोय चाळीची नाचांची गाणी, गौळण गात ढोल ताशांच्या तालावर पारंपारीक पद्धतीने नाचत त्या ठिकाणी जोशपुर्ण वातावरणात तयार केले जाते. राणे परिवाराकडुन बांधलेली मनाची हंडी फोडल्यानंतर मरूआई मंदिराजवऴ हंडी फोडुन पुढे हा गोविंदा पथक गायकर कुटुंबियांच्या जुन्या घरासमोर हेमंतशेठ गायकर यांनी बांधलेली खासगी हंडी आणि एकविरा मंडऴाची होळीच्या माळावरील हंडी फोडुन गावदेवी मंदिर येथून वाकण नाक्यावर येते. तेथे या गोविंदाची साखळी प्रत्येकाच्या घरासमोर जाऊन पारंपारीक नाच, भंडारी गाणी बोलत नंतर मग वाकण येथील झेमसे कुटुंबीयांची हंडी फोडल्यानंतर वाकण नाक्यावरील हंडी फोडण्यात येते. ही हंडी पाहण्यासाठी वाकण नाक्यासह आजुबाजुच्या परिसरातील लोकांची मोठी गर्दी होत असते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!