धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिकसांस्कृतिक
नागोठण्यात बुधवारी श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथीचे आयोजन
गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात होणार सत्कार

नागोठण्यात बुधवारी श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथीचे आयोजन
गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यक्रमात होणार सत्कार
नागोठणे : नाभिक समाजाचे थोर संत श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे आयोजन बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणातील श्री संत ज्ञानेश्वर मंदिरात करण्यात आले आहे. समाजाचे आधारस्तंभ भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली
नागोठणे विभाग नाभिक संघ, महिला आघाडी व संत सेवा मंडळ नागोठणे यांच्या वतीने साजरी करण्यात येणाऱ्या या पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्व नाभिक बंधू आणि भगिनींनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहावे असे आवाहन नाभिक संघ नागोठणे विभाग अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी केले आहे.
श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्त बुधवार दि. २० ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ९.३० वा. श्री. व सौ. ऋतिका रुपेश साळुंखे यांच्या हस्ते कळस पुजन, सकाळी १० ते ११ वाजता संत सेवा मंडळ नागोठणे पंचक्रोशी यांचा भजन कार्यक्रम, सकाळी ११ ते १२ वाजता हभप विजय महाराज शहासने यांचे कीर्तन, दुपारी १२ ते १ वा. दरम्यान श्रीमती मनोरमा रमाकांत रावकर व श्रीमती शालिनी नरेंद्र जाधव यांच्या सौजन्याने नाभिक समाजातील इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी, बारावी, पदविका, पदवी, पदवीत्तर पदवी तसेच अन्य क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दुपारी १.३० वा. नंतर समाजाचे विभागीय अध्यक्ष व समाजातील तरुणांचे आधारस्तंभ बाळासाहेब टके यांच्या सौजन्याने महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ५ वा. दरम्यान महिलांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम व सायंकाळी ७ ते ८ वाजता संत सेवा मंडळ नागोठणे यांचा हरिपाठ असे विविध भरगच्च कार्यक्रमांनी पुण्यतिथी सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती नाभिक संघ नागोठणे शहर अध्यक्ष सुधाकर निंबाळकर यांनी दिली.
श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाई टके यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष मिलिंद गुजर, कार्याध्यक्ष शैलेश रावकर, शहर अध्यक्ष सुधाकर निंबाळकर, खजिनदार रविंद्र टके, सचिव दिगंबर खराडे, महिला आघाडी अध्यक्षा कल्पना टके, कार्यकारिणी सदस्य शामकांत नेरपगार, महेंद्र माने, मंगेश गायकवाड, ऍड. श्रीकांत रावकर, ऍड. रमेश जाधव, राकेश शिर्के, संदिप जाधव, रुपेश जाधव यांच्यासह नागोठणे विभाग नाभिक संघ व महिला आघाडी तसेच संत सेवा मंडळ नागोठणे विशेष मेहनत घेत आहेत.




