धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
नागोठण्यात जागतिक आदिवासी दिन सोहळा उत्साहात साजरा
रोहा तालुक्यातील आदिवासी बांधव झाले सहभागी

नागोठण्यात जागतिक आदिवासी दिन सोहळा उत्साहात साजरा
रोहा तालुक्यातील आदिवासी बांधव झाले सहभागी
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील टी. एस. के. मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेला जागतिक आदिवासी दिन सोहळा नागोठणे विभागासह रोहा तालुक्यातील आदिवासी बांधवांकडून विविधांगी व भरगच्च कार्यक्रमांनी मंगळवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आला.
या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळी ९ वाजता नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्र ते टी. एस. के. मंगल कार्यालयापर्यंत वाजत-गाजत भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नागोठण्यातील टी. एस. के. मंगल कार्यालयात पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार प्रतिमा पूजन करण्यात आले. नंतर दुपारी १२ वाजता मान्यवरांचे समाज प्रबोधनपर मार्गदर्शन झाल्यानंतर विविध कार्यक्रमांनी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या जागतिक आदिवासी दिन सोहळ्यात रोहा तालुका, पेण तालुका व नागोठणे विभागातील आदिवासी ठाकुर समाजातील नोकरवर्ग, निवृत्त शासकीय कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध राजकीय पक्षाचे व विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी तसेच सर्व आदिवासी बांधव सहभागी झाले होते. आपली संस्कृती व अस्तित्व कायमस्वरूपी जतन करण्यासाठी भविष्यात नियोजन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदिवासी ठाकुर उन्नती सामाजिक संस्थेचे रोहा तालुका अध्यक्ष गोविंद शिद, उपाध्यक्ष महेंद्र हंबीर, सचिव कमलाकर बंगारा, कार्याध्यक्ष मच्छिंद्र लेंडी, खजिनदार काशिनाथ शिद आदींसह सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व आदिवासी बांधवांनी मेहनत घेतली.




